कराडमध्ये कॅफेंवर डीवायएसपी अमोल ठाकूर यांची धडक कारवाई; कॅफेंमधून अनेक युवक-युवतींना घेतले ताब्यात

कराड : विद्येचे माहेरघर म्हणून परिचित असणाऱ्या कराडमधील सैदापूर विद्यानगर भागात चालणाऱ्या कॅफेंवर आज अचानकपणे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पोलिसांनी छापे मारले. यावेळी अनेक कॅफेंमध्ये युवक-युवती अश्लील चाळे करत असल्याचे समोर आले असून या कॅफेंमधील युवक-युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, साताऱ्यात देखील असे अनेक कॅफे असून अशा कॅफेंबाबत सातारा न्यूजने वारंवार आवाज उठविला होता. याची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कॅफेंबाबत नियमावली जाहीर केली होती. याचीच अंमलबजावणी करत कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी ही कारवाई केली आहे. मात्र, साताऱ्यात देखील असे अनेक कॅफे अजूनही राजरोसपणे सुरु असून त्यावर पोलीस कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 
 दरम्यान, आज कराड पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे कॅफेचालकांचे धाबे दणाणले आहेत. कराडमधील  सैदापूर-विद्यानगर परिसरात महाविद्यालये असल्याने शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मात्र अलीकडे बंदिस्त कॅफेंचे लोण वाढल्याने शिक्षणाच्या नावाखाली युवक-युवतींची पाऊले कॅफेंकडे वळत आहेत. आज पोलिसांनी केलेल्या या कारवाईवेळी सदर कॅफेंमध्ये युवक-युवती अश्लील चाले करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी पोलिसांनी सदर युवक-युवतींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला