उदयनराजे भोसलेंकडून लोकसभा लढवण्याचे संकेत

सातारा :  येत्या काही दिवसांत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. काही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काही अपवाद नाही, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना तुम्ही आव्हान देणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले म्हणाले, "लोकशाही आहे, या लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यामुळे मी त्यांना आव्हान देण्याची भाषा करणार नाही. मला याबाबत फार बोलायचे नाही". यानंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना, तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवायची आहे का? असा थेट प्रश्न विचारला. यावर 'माझी इच्छा जाऊ दे, तुमची इच्छा काय आहे?', असा प्रतिप्रश्न केला. मात्र, पुन्हा पत्रकारांनी प्रश्न लावून धरल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, "प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही."

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा. या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि २०१९ साली भाजपाकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. या निवडणूकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, आता आगामी निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपाचे उदयनराजे भासले अशीच लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला