सातारा शहरातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी मंजूर आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा
Satara News Team
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सातत्याने भरीव निधी उपलब्ध करून देणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून शहरातील विविध प्रकारची आणखी २९ कामे आता मार्गी लागणार आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून ८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
शहरातील गुरुवार पेठ- शनिवार पेठ येथे सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी ४० लाख, इंदिरानगर रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ५० लाख, विलासपूर, गोळीबार मैदान येथे सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईट बसविणे ५० लाख, देशमुख कॉलनी व मुथा कॉलनी येथे उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटी, विलासपूर, गोळीबार मैदानपरिरसर रस्ते डांबरीकरण करणे ९५ लाख, मंगळवार पेठ येथे कुणबी समाजमंदिर बांधणे ३५ लाख, गोळीबार मैदान शिवप्रेमी कॉलनी निकम घर ते मोरे घर बंदिस्त गटर करणे १० लाख, जानकर कॉलनी बोगदा परिसर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे १५ लाख, मतकर झोपडपट्टी मधील मागासवर्गीय वस्ती येथे समाजमंदिर व रस्ते काँक्रीटीकरण २० लाख, आनंद कॉलनी, घुले घर शाहूनगर रेणुका मंदिर परिसर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे २५ लाख, सैनिक नगर चौक, जेष्ठ नागरिकांसाठी छत्री व शेड बांधणे १५ लाख, भैरवनाथ कॉलनी पिलेश्वर नगर गणेश वंदन बिल्डिंग ते मुजावर घर ते मोहिते बिल्डिंग रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, अंबर प्लाझा येथे ओपन स्पेसमध्ये समाजमंदिर बांधणे यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
शिवनेरी कॉलनी शाहूनगर येथे सभामंडप बांधणे २५ लाख, करंजे पेठ रघुनाथ पुरा ते गोल पार अखेर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १५ लाख, प्रभाग क्र. २२ अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे २५ लाख, करंजे पेठ तोडकर कॉलनी अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे १० लाख, एकदंत कॉलनी गायकवाड घर ते साळुंखे घर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, मोळाचा ओढा मुख्य रस्ता ते पिंटू कडव घर रस्ता काँक्रीट करणे १० लाख, अंजली कॉलनी येथे महिलांसाठी सभागृह बांधणे १५ लाख, पेठ बुधवार येथे सार्वजनिक शौचालय बांधणे ३५ लाख, अविनाश टकले दीपलक्ष्मी कॉलनी अंतर्गत रस्ता करणे १० लाख, महालक्ष्मी मंदिर ते धुमाळ ओढा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, रेणुका सोसायटी अंतर्गत रस्ता करणे १५ लाख, साईप्रसाद कॉलनी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, धर्मवीर संभाजी नगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे १० लाख, गेंडामाळ नाका ते हुतात्मा स्मारक रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण करणे १० लाख, मंगळवार पेठ घाणेकर घर ते तारळेकर ओढा बंदिस्त गटर करणे २० लाख आणि पेठ बुधवार येथील मुस्लिम समाज कब्रस्थानास संरक्षक भिंत बांधणे व सुधारणा करणे यासाठी ९० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 26th Oct 2023 06:15 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 26th Oct 2023 06:15 pm












