मनोजदादा युवा मंचचे कार्य कौतुकास्पद - यशवंत साळुंखे नाना
भाजपा नेते मा.मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागठाणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्नSatara News Team
- Tue 23rd May 2023 10:16 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर: कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त
सोमवार दि.22 रोजी नागठाणे येथे भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले सदर शिबिर एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल हडपसर पुणे आणि मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर चौक नागठाणे येथे अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास मा. विकम पावस्कर, मा. रविंद्र तेलतुंबडे साहेब, ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे आबा, ॲड.धनाजी जाधव, वैजयाताई गुरव, श्रीरंग गोरे आबा, राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मा. यशवंत साळुंखे म्हणाले मनोजदादा युवा मंच चे कार्य कौतुकास्पद असून अशा प्रकारचे कार्यक्रम कायमच राबविण्यात येतात. आपण समाजात राहात असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याच पद्धतीने मनोजदादांचे कार्य चालु आहे. त्यांचे राजकीय व सामाजिक काम पाहाता त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
यावेळी बोलताना मा. मनोजदादा म्हणाले अशी समाजसेवा करण्यात वेगळाच आनंद मिळतो. आजपर्र्यंत 6500 च्या दरम्यान मोतीबिंदु ऑपरेशन केली असुन एकाही रुग्णाला कोणतीच अडचण आली नाही. राजकारण करत असताना २०% राजकारण आणि 80% समाजकारण अशी कामाची पद्धत चालु आहे. येणाऱ्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील.
यावेळी बोलताना विक्रम पावसकर म्हणाले मनोजदादा हे समाजाचे भान असलेले आणि अबाल वृद्धांच्या गणातील ताईत आहेत. त्यांचे कार्य अल्पावधी मध्ये उतुंग झाले असून पुढचा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. अशा पदाधीकारी म्हणुन साजरा करुयात अशा शुभेच्छा यावेळी श्रीरंग गोरे, रविंद्र तेलतुंबडे, राहुल गायकवाड, यांनी मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात ९०० पेक्षा जास्त रुण्नांची तपासणी करण्यात आली तसेच १५० पेक्षा जास्त लोकांना मोतीबिंदू आहे त्यांना एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल व मनोजदादा युवा मंच यांच्या वतीने मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव नलवडे यांनी तर सुत्रसंचालन सागर ढाणे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय काळभोर यांनी केले
या कार्यकमास सौ. रूपाली बेंद्रे, अनिल साळुंखे, नकुशा चव्हाण, मधुकर बाबा, सुधीर जाधव, संजय साळुंखे, शहाजी शेठ काळभोर, बजरंग जाधव, जालींदर आवळे, शंकर साळुंखे, सुनिल पाटील, अविनाश साळुंखे, लखन साळुंख, इं द्रजित ताटे, अदित्य दळवी, नागेश बेंद्रे, प्रशांत चव्हाण, आदि मान्यवर व विभागातील ग्रामस्थ महिला भगिंनी मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट आज दिनांक २३-५-२०२३ रोजी सकाळी ठीक ९ वाजता मसूर एस. टी स्टँड समोर खटाव माण साखर कारखाना कार्यालायामध्ये मोती शस्त्रक्रिया शीबीर आहे तरी कराड तालूकयातील रुण्नांनी याचा लाभा घ्यावा.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 23rd May 2023 10:16 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 23rd May 2023 10:16 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 23rd May 2023 10:16 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 23rd May 2023 10:16 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 23rd May 2023 10:16 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 23rd May 2023 10:16 am












