गोंदवल्यात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची दाटली मांदियाळी...
Satara News Team एकनाथ वाघमोडे- Wed 13th Jul 2022 09:45 am
- बातमी शेयर करा
दहिवडी : तमाम महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांचा श्रद्धास्थान असलेल्या माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे गरूपौर्णिमेनिमित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची मांदियाळी दाटली होती. आपल्या गुरुच्या भेटीला गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले या ठिकाणी अनेक भाविक उपस्थित होते सकाळी सात ते पाच वाजल्यापासूनच मंदिर परिसरात भाविक भक्तांची गर्दी निर्माण झाली होती आजच्या गुरुपौर्णिमेला भारतीय संस्कृती अनन्य साधारण महत्त्व असल्याने गोंदवले या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे अनेक भक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यामुळे आपल्या या गुरूला भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविक भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याने गोंदवले या ठिकाणी भाविक भक्तांची मांदियाळी दाटली होती.
आषाढात आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आणि भाविक भक्तांना लागलेली गुरुदर्शनाची आस यांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी चांगलाच मेळ बसला आणि भाविकांवर भर पावसात दर्शन घेण्याची वेळ आली होती.त्यामुळे पडत्या पावसात का होईना पण भाविकांनी गुरुदर्शनाची आस न सोडता गोंदवलेकर महाराजांच दर्शन घेतले.
'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू तोच वारसा' उक्तीप्रमाणे गुरु आपल्याला ज्ञान देत असतो आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याबरोबरच आयुष्याला देखील वळण देत असतो त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला गोंदवले या ठिकाणी दरवर्षी तमाम भक्तांची गर्दी होत असते.दर्शन झाल्यानंतर गोंदवले या ठिकाणीच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे अन्नदानही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात केले जाते त्यामुळे या महाप्रसादाचाही लाभ घेण्यासाठी परिसरासह राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक भक्त गर्दी करत असतात.
गेले दोन वर्ष कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे अनेक भाविक भक्तांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेता आलं नव्हतं परंतु यावर्षी सर्व काही सुरळीत झालं आणि महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी खुली झाली.त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले या ठिकाणी सुमारे ६० ते ७० हजार भाविक भक्तांची मांदियाळी दाटल्याचे दिसून आले.
दहिवडी पोलिसांची भूमिका कौतुकास पात्र
यात्रा,सण,उत्सव, उरूस,आदीप्रसंगी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असणाऱ्या दहिवडी पोलिसांनी गोंदवले येथे भर पावसात का होईना बजावलेली भूमिका ही सर्वत्र कौतुकाचा विषय बनली आहे.
गोंदवले येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी अशी रांग लागली होती.
-(छाया : एकनाथ वाघमोडे)
gondvlekar
bhrmhchetany
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 13th Jul 2022 09:45 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 13th Jul 2022 09:45 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 13th Jul 2022 09:45 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 13th Jul 2022 09:45 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 13th Jul 2022 09:45 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 13th Jul 2022 09:45 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 13th Jul 2022 09:45 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 13th Jul 2022 09:45 am













