माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत

अवैध धंदेवाल्यानी मांडले बस्तान, कायद्याला दाखवले स्मशान

सातारा : सातारा जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरु असल्याने तरुण पिढी वाममार्गाला लागण्यास मोठे पाठबळ मिळत आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरांबरोबरच तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा अवैध धंदे चालवणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस प्रशासनाची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दहिवडी, वडूज, म्हसवड हद्दीत त्याचबरोबर माण-खटाव तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये अनेक ठिकाणी मटका, जुगार, चक्री, दारू विक्री, गुटखा विक्री यांसारखे अनेक अगदीच धंदे राजरोसपणे सुरु आहेत. पोलीस प्रशासन मात्र या अवैध धंदेवाल्यांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. त्यामुळे 'अवैध धंदेवाल्यानी मांडले बस्तान, कायद्याला दाखवले स्मशान' असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. 

 माण-खटाव हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी सध्या याच तालुक्यांमध्ये अवैध धंद्यांना सुकाळ आल्याचे चित्र दिसून येत आहे. दहिवडी उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रामुख्याने डिस्कळ, पुसेगाव, पुसेसावळी, वडूज, दहिवडी, मायणी, कलेढोण, वडगाव, सिद्धेश्वर कुरोली, चौकीचा आंबा, म्हसवड, गोंदवले यांसारख्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. काही ठिकाणी पोलिसांचे पाठबळ या अवैध धंदेवाल्यांना मिळत असल्याने हे धंदे जोमात सुरु आहेत. त्यामुळे माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 राज्यात गुटखा, मावा विक्रीला पूर्ण बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर याची बिनबोभाट मोठ-मोठ्या आलिशान गाड्यांमधून वाहतूक करून त्याची विक्री छोट्या-मोठ्या टपऱ्यांमध्ये सुरू आहे. यामुळे अनेक युवक या व्यसनांकडे ओढले जात आहेत. अन्न, औषध प्रशासनाचे याकडे लक्ष देणे देखील तेवढेच गरजेचे आहे. माण-खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालला असताना अन्न व औषध आणि पोलीस प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी तर मटका व चक्री चालवणाऱ्या अवैध धंदेवाल्यांनी थेट ग्राहकांसाठी ऑफरच चालू केल्याने अनेक जण या अमिषाला बळी पडून यात गुंतले जात आहेत. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. 

त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत आपल्या विभागातील ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्याची गरज आहे. अशी मागणी जनतेतून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त