पुसेसावळी दंगलीतील मुख्य सूत्रधारास वाचवण्याचा प्रयत्न करू नये- अध्यक्ष नौशाद शिकलगार
निसार शिकलगार - Wed 20th Sep 2023 11:40 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव : पुसेसावळी दंगल घडविण्यात कुणाचा हात होता हे एव्हाना स्पष्ट झाले असून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन योग्य त्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहेत, मात्र तरीही काही मुस्लिम युवकांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर होत असल्याने हा समाजाला दिशाभूल करणारा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र शिकलगार संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
पुसेसावळी गावाला स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास असून, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या गावाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या गावात घडलेली दंगलीसारखी घटना निश्चितच दुर्दैवी असून, सरकारने या घटनेची चौकशी निपक्षपातीपणे करावी, अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्यानंतर पुसेसावळी येथे जमलेल्या जमावाने प्रार्थनास्थळावर हल्ला करत अल्पसंख्याक समाजातील युवकांना मारहाण केली. या हल्ल्यात नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या प्रकरणामागे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकरचा हात असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून समाजातील वातावरण दुषित करणाऱ्या विक्रम पावसकरला अद्याप अटक झाली नसल्याने अनेक संघटनांनी निषेध केला असून अशा समाजविघातक व्यक्तीस कोणाचीही पाठराखण असली तरी वाचवू नये, असे नौशाद शिकलगार यांनी म्हटले आहे.
पुसेसावळी तालुका खटाव येथे झालेली दंगल महाभयंकर होती कोणत्याही समाजाला न परवडणारी न पेलणारी होती. या दंगलीत एका निष्पाप तरुणाचा जीव गेला ज्याचा दुरान्वयेही संबंध नव्हता. धर्मांध झालेल्या तरुणांनी त्याची क्रूर पद्धतीने हत्या केली होती. या दंगलीमध्ये कितीतरी जण जखमी झाले, कितीतरी जणांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांची दुकाने व गाड्या पेटवल्या, माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य काही धर्मांध व्यक्तींनी केले. ही बाब कोणत्याही समाजातील लोकांनी निश्चितच समर्थन व दुजोरा देणारी नव्हती आणि नाही. परंतु हा हल्ला एका विशिष्ट धर्मांच्या लोकांवर करण्यात आला होता.
दुसऱ्या बाजूला या दंगलीतील सूत्रधार विक्रम पावसकर याला अटक करावी म्हणून समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अल्ताफ शिकलगार व सादिक शेख आणि मुस्लिम समाजाचे काही प्रमुख कार्यकर्ते यांच्यावरच वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावेत अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. बिनबुडाच्या या आरोपामध्ये काहीही तथ्य नसून केवळ जनतेची प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी व प्रकरण दाबण्यासाठी हा प्रकार सुरू झाला आहे. विक्रम पावसकरला वाचवण्यासाठी उभे केलेले हे षडयंत्र आहे. अशा तरुण मुलांना किंवा लोकांना जातीयतेचे विष पाजून तरुणांना पुढे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे हे कटकारस्थानच म्हणावे लागेल.
दंगलीचा मास्टर माईंड याला सोडवण्यासाठी,अविचारी टाळकी असा विचार तरी कसा करतात,याचा शोध घेणे ही तितकेच गरजेचे आहे. अशा तरुणाईला वेळीच प्रशासनाने आवर घालणे गरजेचे असून त्याचबरोबर समाजानेही याबाबत गंभीरतेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच भविष्यात होणारा मोठा अनर्थ टळू शकेल आणि असे तरुण प्रशासनाच्या होणाऱ्या कारवाई पासून वाचतील. त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल. अशा तरुणांनी माथे पेटवून देणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे निश्चितच स्वतःसह सर्व समाजाला सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी जगामध्ये प्रसिद्ध असणारी भारतीय संस्कृती निश्चितच सर्वच समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल , असे मत महाराष्ट्र शिकलगार संघटनेचे धडाडीचे व सर्वच समाजासाठी नेहमी धडपड करणारे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
अल्ताफ शिकलगार व सादिक शेख व अन्य कार्यकर्त्यांनी पुसेसावळी दंगलीतील अन्याय झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत आवाज उठवल्याबद्दल बिन बुडाचे आरोप करून काही हिंदुत्ववादी संघटना विक्रम पावसकर यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व स्तरातील जनतेच्या हिताचं नाही.-हुसेन शिकलगार
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 20th Sep 2023 11:40 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 20th Sep 2023 11:40 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Wed 20th Sep 2023 11:40 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Wed 20th Sep 2023 11:40 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 20th Sep 2023 11:40 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 20th Sep 2023 11:40 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 20th Sep 2023 11:40 am













