जावळीत 15 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजले!, ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान
प्रकाश शिंदे - Wed 9th Nov 2022 03:00 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाकडून जावळी तालुक्यातही 15 ग्रामपंचायती अटीतटीच्या लढती होणार आहेत पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे
राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदेशानुसार १८ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस जारी होईल. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत जावळी तालुक्यातील 15 गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल.
जावळी तालुक्यातील घोटेघर रिटकवली रुईघर भोगावली तर्फ कुडाळ वालुथ रामवाडी सोमर्डी, मोरघर केळघर कुसुंबी वाकी शिंदेवाडी आखाडे करहर अशा एकूण 15 ग्रामपंचायती निवडणुका लागल्या आहेत
यातच जावळी तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा समतोल तोला मोलाची झाला असून। जावळी तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा प्रबळ गट प्रत्येक गावात असून निवडणूक लागलेल्या 15 गावात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या गटाच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे गट देखील या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे यातच शिवसेना गट व मुख्यमंत्री शिंदे गट आपली ताकद दाखवणार आहे
जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या गटाला आवाहन देण्यासाठी 15 ग्रामपंचायत मध्ये स्थानिक आघाड्या नेते गटनेते शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी यासह इतर आघाड्या पुन्हा एकदा राजकीय द्वंद्व लढणार असल्याचे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहेत थंडीच्या दिवसात जावळी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची गरमागरम व राजकीय हाय व्होल्टेज ग्रामपातळीवरील ड्रामा डिसेंबर महिन्यात दिसणार आहे त्यामुळे कोणता पक्ष किती ग्रामपंचायती ताब्यात घेणार कोणाच्या किती ग्रामपंचायती याकडे आता प्रचाराची रणधुमाळी व रणनीती सुरू होणार आहे यातच राज्य पातळीवरून पक्षीय पातळीवर जिल्हास्तरावर नेते उपनेते कार्यकर्त्यांवर ग्रामपंचायती आपापल्या गटाकडे व पक्षाकडे ताब्यात ठेवण्याच्या आदेश धाडले गेले आहेत
खरंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
संबंधित तहसीलदार 18 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. शनिवार व नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Wed 9th Nov 2022 03:00 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Wed 9th Nov 2022 03:00 pm











