पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटात रणधुमाळी तापली असून, येथील राजकीय वातावरण फक्त "कोणाला निवडून आणायचं" यापेक्षा आता "कोणाला पाडायचं" यावर केंद्रित झालं आहे. स्थानिक सूत्रांनुसार, गेल्या काही वर्षांत या गटात घराणेशाही, धनशक्ती आणि प्रस्थापित पक्षांचं मुख्यतः भाजप, राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र या वेळी लढतीचा "प्रस्थापितांना पाडणं" हाच मुख्य अजेंडा बनला आहे. अनेक उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचारात "घराणेशाही संपवा", "धनशक्तीला हरवा" आणि "नवं नेतृत्व हवं" असे नारे देत आहेत.

           एक स्थानिक मतदार म्हणाला, "इथे विकासापेक्षा घराणेशाही आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. यावेळी बरेच जण 'कोणालाही चालेल पण प्रस्थापितांना पाडायचं' असं म्हणतायत." दुसऱ्या मतदाराने सांगितलं, "पुसेसावळी गटात धनशक्ती 'यशस्वी' होणार की जनशक्ती? हा प्रश्न आहे."

राजकीय निरीक्षकांचं मते

या गटात महायुतीच्या अंतर्गत तणाव दिसतोय. भाजपचा प्रभुत्व, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत असल्याने "पाडण्याचा" अजेंडा मजबूत झाला आहे. काही निरीक्षकांचं म्हणणं आहे की, "निवडून आणण्यापेक्षा प्रस्थापिताला पाडणं हा मुख्य उद्देश बनला तर मतविभागणी होऊन शिवसेना शिंदे गट किंवा नव्या खेळाडूला फायदा होऊ शकतो."

      खटाव तालुक्यात बुध, खटाव, कातरखटाव, निमसोड, औंध, पुसेसावळी आणि मायणी आशा एकुण सात गटातील बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट अशी लढत असून काही अंशी यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट अशी लढत असून तालुक्यातील एकमेव ठिकाण असे आहे ते पुसेसावळी जिल्हा परिषद गट या ठिकाणी राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारच्या तिन्ही घटकपक्षांचे कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण एकमेकां समोर दंड थोपटून उभे असल्याचे दिसून येते. त्यामुळे पहिल्यांदाच या गटात मतदारांना नोटा (None of the Above) बटन दाबण्याऐवजी धनुष्यबाण चिन्हाकडे (शिवसेना शिंदे गट)वळण्याचे आवाहन जोर धरत आहे.

          निकाल ९ फेब्रुवारीला लागणार असून, पुसेसावळी गटातील ही लढत "विकास vs घराणेशाही" किंवा "धनशक्ती vs जनशक्ती" एवढीच नाही, तर "पाडण्याची" भावना किती प्रभावी ठरते यावर अवलंबून आहे. स्थानिक पातळीवर चर्चा आहे की, यावेळी मतदार "नकारात्मक मतदान" (negative voting) करू शकतात – म्हणजे कोणाला निवडायचं यापेक्षा कोणाला हरवायचं यावर भर देऊ शकतात.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला