जावळी बाजार समितीच्या सभापतिपदी जयदीप शिंदे बिनविरोध निवडी उपसभापतिपदी हेमंत शिंदे यांची निवड
Satara News Team
- Sat 27th May 2023 11:26 am
- बातमी शेयर करा
सातारा -जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सोनगाव (ता. जावळी) येथील जयदीप शिंदे यांची तर उपसभापतिपदी कुडाळ येथील हेमंत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तिन्ही आमदारांनी आपापासातले पक्षीय पातळीवरील गटतट व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेऊन ही निवडणूक एकत्रित लढवून सर्व जागांवर विजय मिळवला होता. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाला ८ जागा, आमदार शशिकांत शिंदे गटाला ५ जागाव आमदार मकरंद पाटील गटाला ५ जागा अमा जागावाटपाचा फॉप्युला ठरवण्यात आला होता. त्यामुळे सर्वाधिक जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाच्या निवडून आल्याने आज झालेल्या पदाधिकारी निवडीत सभापतिपदी आमदार भोसले यांचे समर्थक जयदीप शिंदे यांची निवड करण्यात आली. उपसभापतिपदी आमदार शिंदे गटाकडून हेमंत शिंदे यांना संधी देण्यात आली. बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पदाधिकारी निवडीसाठी आज बाजार समितीच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सभापतीपदासाठीजयदीप शिंदे यांचे नाव संचालक राजेंद्र मिलारे यांनी सूचित केले. त्यास मच्छिंद्र मुळीक यांनी अनुमोदन दिले. उपसभापतिपदासाठी हेमंत शिंदि यांचे नाव संचालक बुवासाहेब पिसाळ यांनी सूचितकेले. त्यास मनेष फरदि यांनी अनुमोदन दिले. सभापती व उपसभापतिपदासाठी प्रत्येकी एक- एक अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.
प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक अधिकारी नानासाहेब रूपनवर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले, नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सदस्यांचे आमदारशिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, अमित कदम यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीच शुभेच्छा दिल्या . बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांनी आभार मानले. निवडीनंतरकार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी वगुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आले
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sat 27th May 2023 11:26 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 27th May 2023 11:26 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 27th May 2023 11:26 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 27th May 2023 11:26 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 27th May 2023 11:26 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th May 2023 11:26 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th May 2023 11:26 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 27th May 2023 11:26 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 27th May 2023 11:26 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 27th May 2023 11:26 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 27th May 2023 11:26 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 27th May 2023 11:26 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 27th May 2023 11:26 am













