वेण्णा नदी संवाद यात्रेचा जल पुजनाने समारोप

सातारा  :  चला चाणुया नदी अभियानांतर्गत वेण्णा नदी संवाद यात्रेचा समारोप जनजागृतीपर प्रभात फेरी  आणि वेण्णा नदी जलपुजनाने करण्यात आला.या प्रसंगी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, कृष्णा नदी समन्वय प्रदीप पाटणकर, क्षेत्र माहुलीच्या सरपंच नुतन साळुंखे, श्रीराम हायस्कूलच्या मुख्याध्यापक निर्मला जगदाळे यांच्यासह सिंचन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते

पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज
- अशोक पवार

पृथ्वीवर 3 टक्के पाणी पिण्योग्य आहे. प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा काटसरीने वाटप करणे ही आता काळाची गरज आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे प्रदूषण व उपाययोजना करण्याचा शासनाचा मानस आहे. प्रत्येक नागरिकांने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे त्याचबरोबर नदी, नाले, ओढे, तलाव यांमध्ये कचरा टाकू नये. सिंचन विभागाच्या पाटांमध्ये काही नागरिक कचरा टाकतात, या पाटांमधील पाणी पिण्याबरोबर शेताच्या सिंचनासाठी वापरले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या पालकांमध्ये कचरा निर्मलनाचे महत्व सांगितले पाहिजे, असेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी कृष्णा नदी समन्वयक श्री. पाटणकर यांनीही   मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद यादव तर सुत्रसंचालन पुजा देशमुख यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त