धाकल्या पवारांच्या स्वागताला तरुणतर्क पवारांच्या गटातील ‘छुपे रूस्तम’ बाहेर पडणार ?
प्रकाश शिंदे - Sun 10th Sep 2023 11:29 am
- बातमी शेयर करा
सातारा : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची सातारा जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वागताचे बॅनर झळकले आहेत. बॅनर्सच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड होणार असून काही छुपे रुस्तम उद्या प्रत्यक्ष दौऱ्यावेळी बिळातुन बाहेर येणार आहेत.
अजित पवार कोल्हापूरला जाताना सातारा आणि कराड शहरात दाखल झाल्यानंतर यांचे भव्य स्वागत होणार आहे यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करणार आहेत. त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे.अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहें
सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादा एकदाही सातार्यात आलेले नाहीत. आज त्यांची कोल्हापूर येथे सभा आहे. कोल्हापूर येथे सभेला जाण्यासाठी ते राष्ट्रीय महामार्गावरून सातार्यातून जाणार आहेत. अजितदादा प्रथमच सातार्यावरून जाणार असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीचा दुसरा गट सरसावला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर या प्रक्रियेत अग्रभागी आहेत. आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण हेही अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. महामार्गावर जे स्वागत शरद पवारांचे झाले, तेवढ्याच दणक्यात अजित पवारांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे. उघड उघड दोन पवार गटांत संघर्षाची चिन्हे आहेत. कोणाचे स्वागत जोरात होणार यासाठीही चढाओढ होणार हे नकीच त्यातून कोणता पवार गट मोठा हे दाखवले जाणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांनी अजितदादांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.तर खासदार श्रीनिवास पाटील आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार,असे जाहीर केले. आता या स्वगताची जबाबदारी आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होणार आहे.तर या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड होणार असून काही छुपे रुस्तम आज प्रत्यक्ष दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री याच्या स्वागतासाठी बिळातुन बाहेर येणार आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 10th Sep 2023 11:29 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 10th Sep 2023 11:29 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 10th Sep 2023 11:29 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 10th Sep 2023 11:29 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 10th Sep 2023 11:29 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 10th Sep 2023 11:29 am












