शेरे ता. कराड येथील ॲड.बाळासाहेब शेरेकर कृष्णा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद

मसूर : अंबवडे बु।। ता. सातारा येथील रंगराव देशमुख माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या शालेय शासकीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शेरे ता. कराड येथील ॲड.बाळासाहेब शेरेकर कृष्णा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने अजिंक्यपद पटकावत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंना क्रीडाशिक्षक बी.एस.पानवळ, ए. एल. पवार, सौ. एस.एस.नरूले, व्ही. एम. शेवाळे, ए.एन.मोहिते  यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 
विजयी संघाचे संस्थेचे सचिव अभयकुमार बाळकृष्ण पाटील यांनी  कौतुक व अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक  एस. आर. कांबीरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विजयी संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त