डंपरची दुचाकीस धडक एक ठार दोन जखमी

वाई :वाई पाचगणी रस्त्यावर गांधी पेट्रोल पंपा जवळ डंपरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक जागीच ठार झाले .तर त्यांची दोन नातवंडे गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी  एकच्या सुमारास हा अपघात झाला. शामराव सहदेव कांबळे (वय ७२ रा विश्वकोश कॉलनी वाई) हे त्यांच्या स्कुटी क्रमांक (एम एच ११बीपी ४६७९) या दुचाकीवरून सुमेध व सिद्धांत या नातवंडांना शाळेतून घरी घेऊन येत असताना  रस्ता ओलांडून विश्वकोश कॉलनीतील घराकडे जात होते.यावेळी पाचगणीहुन भरधाव वेगाने आलेल्या डंपर क्र ( एम एच ११ सी एच ५४८४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये यामध्ये शामराव कांबळे यांचा जागी मृत्यू झाला. तर त्यांची दोन्ही नातवंडे गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर अजनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डंपर चालक दशरथ दत्तात्रय पवार ( राहणार गोडोली पाचगणी ता महाबळेश्वर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .अधिक तपास उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला