साताऱ्यात पेंटिंगवरून तणाव; छत्रपती उदयनराजे व मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका
Satara News Team
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानानजीक खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते.. मात्र सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज (मंगळवार) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितले. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा यावेळी पेंटरने दिला आहे.
स्थानिक बातम्या
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
संबंधित बातम्या
-
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्हीडीके कंपनीचा स्वच्छता ठेका रद्द
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
-
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Tue 7th Mar 2023 11:19 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 7th Mar 2023 11:19 pm












