भणंग ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा....

मेढा, : भणंग ता. जावली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानात सर्व अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून सर्व जागा अपक्ष उमेदवारांनी मताधिक्याने जिंकल्या आहेत. सर्व अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळे हा निकाल सर्वांसाठीच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.

जावली तालुक्यातील भणंग या एकाच ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पहिल्या टप्प्यात जाहीर झाला होता. दरम्यान या निवडणुकीसाठी रविवार (दि.१६ ) रोजी मतदान पार पडले. यावेळी मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानात  ८२ टक्के मतदान झाले होते. 
माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिन्द्र क्षीरसागर यांच्या श्री. पाडळेश्वर ग्रामविकास पॅनल व इतर सर्व अपक्ष उमेदवारांत ही निवडणूक रंगली होती. एकच पॅनल व इतर सर्व उमेदवार अपक्ष उभे राहिल्यामुळे या निवडणुकीची चर्चा सर्वत्रच होती. त्यातच या अधिकृत पॅनलचा पराभव करीत सर्व अपक्ष निवडणून आल्यामुळे भणंग गावासाठी हा निकाल धक्कादायक तर तालुक्यासाठी हा निकाल आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. निवडणूक आलेल्या उमेदवारांवर इतर पक्ष आपला हक्क सांगत असून अपक्ष उमेदवार कोणाला पसंती देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अपक्ष उमेदवारांच्या विजयाचे वाटेकरी....
अपक्ष उमेदवारांच्या विजयात धनराज जगताप, मोहन जगताप, जितेंद्र जगताप, रामदास जाधव, अंकुश जाधव, दत्ता जाधव, रामदास भोसले, बबनराव गाडे, जनार्दन गाडे, आनंद जाधव, सुरेश निकम, कृष्णा जाधव, शामराव भोसले यांचा मोलाचा वाटा आहे.

फोटो:भणंग: विजयानंतर आनंदोत्सव साजरा करताना अपक्ष उमेदवार..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला