चळवळीतील नेते आता फक्त स्टेजवरचेच वक्ते राहिलेत

सामाजिक चळवळीतून समाजाचा विकास होणे काळाची गरज
 The leaders of the movement are now only stage speakers

सातारा :  रस्त्यावरची लढाई करून समाजाचा विकास करणारं नेतृत्व राहिलं नसून आता फक्त स्टेजवरचे नेते शिल्लक असल्यामुळे अन्यायाच्या विरोधातला लढा देत असताना सामाजिक चळवळीतून समाजाचा विकास होणे ही काळाची गरज असून चळवळीतून ज्यांनी जातीवादाला विरोध केला तेच आता जातीयवादी पक्षाच्या सावलीला विसावलेत असं सूचक विधान पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले ते विठ्ठलवाडी ता कराड येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी (युवक)इंद्रजीत शंकर चव्हाण (विठ्ठलवाडी ता.कराड )यांचे निवडी प्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना प्रा. वायदंडे म्हणाले की, समाजाने अनेक नेतृत्वाकडे आशेनं बघितलं परंतु त्या नेत्यांनी सामाजिक चळवळीतून स्वार्थ साधल्यामुळे आता हे नेते स्टेजवरचे मर्यादित राहिल्यामुळे रस्त्यावरची लढाई करण्याची जबाबदारी आता तरुण पिढीवर असून ती जबाबदारी घेण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही म्हणाले.स्वागत कराड तालुका अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय साठे ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा मुसा भाई मुल्ला ,सातारा जिल्हा अध्यक्षा सुकशिनी साठे, सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष वनिता सोनवले यांचीही भाषणे झाली.सदर कार्यक्रमास शाखाध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण, तुषार चव्हाण ,खजिनदार सागर मलगवंडीव, संपर्कप्रमुख गुलाब साठे, सेक्रेटरी सागर चव्हाण ,कार्याध्यक्ष अधिक चव्हाण, सदस्य विश्वनाथ चव्हाण ,ओंकार चव्हाण ,संतोष चव्हाण, आदित्य चव्हाण, मंगेश आवळे, सुजय चव्हाण, गणेश चव्हाण, प्रमोद चव्हाण, आमीत चव्हाण, प्रतीक चव्हाण, गणेश बडेकर, वैभव चव्हाण, श्रवण चव्हाण, श्रीधर चव्हाण, महेश चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सुनील चव्हाण, विठ्ठल टोमके, कराड तालुका उपाध्यक्ष रमेश साठे, आनंदा साठे, संतोष साठे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी आभार कराड तालुका उपाध्यक्षा सीमा साठे यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

 औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला