ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील श्री नवलाई देवी पतसंस्था निवड बिनविरोध

पुसेगाव ; ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील श्री नवलाई देवी पतसंस्था मर्यादित ल्हासुर्णे बँकेची पंचवार्षिक निवडणुक ही  सर्वांनुमते बिनविरोधच करण्यात आली श्री सुरेश रघुनाथ जाधव व व्हा चेअरमन पदी श्री सुनील जगन्नाथ सावंत यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली .तसेच संचालक पदी भगवान कोंडीबा घाडगे, डॉ .नितीन हणमंत सावंत, विठ्ठल हरिबा गुरव ,निवृत्ती हणमंत घाडगे, अनिल बाळकृष्ण चव्हाण ,गौतम नामदेव इंगळे यांची निवड करण्यात आली .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे जिल्हाध्यक्ष श्री तेजस दादा  शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ल्हासुर्णे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नूतन पतसंस्थेतील संचालकांचा तसेच विकास सेवा सोसायटीतील नूतन संचालकांचा सत्कार कोरेगाव तालुक्याचे आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला ल्हासुर्णे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नूतन पदाधिकाऱ्यांचा ही सत्कार आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये रमेश उबाळे यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागच्या जिल्हाध्यक्ष पदी तर सादिक चांद शेख राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच कृष्णा खोरे महामंडळातील बशीर गुलाब शेख यांचा प्रदीर्घ सेवानिवृत्तीचाही सत्कार येथे करण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला