वाई बस स्थानकासमोर अपघात ,एकाचा मृत्यू चार जखमी.

वाई : वाई महाबळेश्वर रस्त्यावर वाई बस स्थानकाच्या समोर भरधाव मोटारीने पदचार्‍यांना ठोकर मारल्याने एका पदाचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले. वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.भर गर्दीच्या रस्त्यात भरधाव वाहन घुसल्याने हा अपघात झाला असे परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. 

वाई बस स्थानकाच्या समोर महाबळेश्वर येथून वाई शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वाहनाने गाडी क्रमांक (एमएच ०४ जीई ६६९५) रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पदचार्‍यांना जोरदार धडक मारली. गाडी त्याच वेगात पुढे जात राहिल्याने गाडीच्या धक्क्याने एका पदाचाराचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते ( सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वारोशी, ता महाबळेश्वर) सिताराम धायगुडे (वाई) व शिवांश जालिंदर शिंगटे(राऊतवाडी ता कोरेगाव)हा साडेतीन वर्षांचा) हे गंभीर जखमी झाले. जखमीना वाई व सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

सर्व पदचारी वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचार च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले,कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन

जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला