लाईट गेल्यास महावितरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करु
माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा महावितरण कार्यालयास इशाराSatara News Team
- Tue 21st May 2024 03:41 pm
- बातमी शेयर करा
सातारा: सध्या प्रचंड उकाडा आहे. 40 अंशाच्या दरम्यान तापमान आहे. त्यातच अध्येमध्ये वळीवाचा पाऊस वादळीवाऱ्यास पडत आहे. शहर व परिसरात विद्युत पुरवठा त्वरीत बंद पडतो आहे किंवा जाणीवपूर्वक बंद केला जात आहे. अचानक विद्युत पुरवठा बंद केल्याच्या प्रकारामुळे घरातील विद्युत उपकरणे जळत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. दिवसा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. हे थांबले नाही तर महावितरण कार्यालयाच्यासमोर सर्व जनतेच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीला दिलेला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपण सध्या आपल्या स्वखुशीने लाईट बंद करता व चालू करता ते योग्य नाही. सध्या उन्हाळा हा अतिशय तीव्र व कडक स्वरुपाचा आहे. सध्याचे तापमान हे सतत 40 अंशाच्या दरम्यान आहे. त्यातच अधून मधून कधी थोड्या प्रमाणात तर कधी मोठया प्रमाणात वादळासह वळीवाचा पाऊस पडत आहे. सध्या थोडा जरी पाऊस पडला तरी सातारा शहर व परिसरातील विद्युत पुरवठा त्वरीत बंद पडतो आहे किंवा जाणीवपूर्वक बंद केला जात आहे. विद्युत पुरवठा बंद पडल्यानंतर आपल्या कार्यालयास फोन केल्यानंतर आपल्याकडे त्याची ठराविक कारणे तयार असतात. सध्या वळीवाच्या पावसामुळे जर विद्युत पुरवठा खंडीत होत असेल तर जूनमध्ये पावसाळा सुरु झाला तर आपण पुर्ण पावसाळा हंगामामध्ये वीज पुरवठा बंद ठेवणार आहात काय, महावितरण कंपनीने जरा सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. तसेच सर्वसामान्य जनतेला बिल भरण्यास थोडा वेळ झाला तरी आपण त्वरीत त्याची मागील हिस्ट्री न पहाता विद्युत पुरवठा कट करता. 31 मार्चला आपण सर्व बिले वसुल करुन घेता. जशी आपण वसुलीची मोहिम राबवता तशी लाईन न जाईल याचीही मोहिम राबवा. आम्हा सातारकरांना नाहक त्रासापासून वाचवा. कारण रात्र रात्र वीज नसेल तर नागरिकांची काय अवस्था होत असेल याचा आपण सहानभूतीपूर्वक विचार करावा. तसेच अचानक लाईट गेल्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रीक उपकरणे जळतात व त्याचाही त्रास आपल्यामुळे नागरिकांना सहन करावा लागतो. सध्या दिवसा वीज बंद होण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जर येथून पुढे अशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला आपल्या कार्यालयाच्यासमोर जनतेच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, कायदा व सुवस्था बिघडल्यास त्यास आपली महावितरण कंपनी पुर्णपणे जबाबदार राहिल, असा इशारा दिला आहे.
#electricity
#ElectricityfromSolarProject
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 21st May 2024 03:41 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 21st May 2024 03:41 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 21st May 2024 03:41 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 21st May 2024 03:41 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 21st May 2024 03:41 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 21st May 2024 03:41 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 21st May 2024 03:41 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 21st May 2024 03:41 pm











