ज्ञानदीप सामाजिक केंद्राच्यावतीने वर्णे हायस्कूलला स्पर्धा परीक्षेची पुस्तके प्रदान

देशमुखनगर : ज्ञानदीप सामाजिक सेवा केंद्र मुंबईच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच पंढरपूर येथील आश्रम शाळेस  ग्रंथालयीन पुस्तकांचे  वितरण मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. आज स्वातंत्र्यदिनी  सातारा तालुक्यातील  वर्णे येथील श्री काळभैरव विद्यालयाला ज्ञानदीप सामाजिक सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळालेली पुस्तके सातारा येथील उद्योजक आणि वर्णे ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्रीकांत पवार,चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांच्या शुभहस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार बाईंग यांना प्रदान करण्यात आली.
       शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागाचा टक्का वाढण्याच्यादृष्टीने ५ वी , ८वी  शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती(एन. एम. एम. एस.) परीक्षा तसेच संदर्भ पुस्तकांचा समावेश आहे.ज्ञानदीप सामाजिक सेवा केंद्र हे ज्ञानदीप पतसंस्थेचा एक भाग आहे. या सेवा केंद्राच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.कोविड १९ महामारीच्या काळात ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या  मार्गदर्शनाखाली किर्तनकांराना अर्थसाह्य करण्यात आले होते. सन २०२१ मध्ये जिल्ह्यातील ११ शाळांना विज्ञान साहित्य व गरजू मुलांना मोबाईलचे वितरण करण्यात आले होते. या संस्थेच्या वतीने वाई तालुक्यातून जि.प.शाळा, कवठे,अरविंद पवार पाटील विद्यालय, वेळे, फलटण तालुक्यातून ज्योतिर्लिंग हायस्कूल, पवारवाडी,जि. प.शाळा, आळजापूर ,खंडाळा तालुक्यातून पूज्य बापूजी साळुंखे विद्यालय, असवली,जि. प.शाळा, बावडा, महाबळेश्वर तालुक्यातून कोयनाखोरे विद्याविकास हायस्कूल, शिरवली,हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार,जावली तालुक्यातूनन्यू इंग्लिश स्कुल कुसुंबी,क्रांती विद्यालय, सावली,कराड तालुक्यातून शिवाजी विद्यालय, मसूर, जागृती विद्यालय, बनवडी,पाटण तालुक्यातून वत्सलादेवीदेसाई हायस्कूल, मरळी,ना. बाळासाहेब देसाई हायस्कूल, कुसरुंड, माण तालुक्यातून जानुबाई विद्यालय, विरळी,न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी,सातारा तालुक्यातून प्रतापसिंह महाराज हायस्कूल, भरतगाववाडी,श्री काळभैरव विद्यालय, वर्णे आणि कोरेगाव तालुक्यातून सौ. वत्सला भोईटे माध्यमिक विद्यालय, तडवळे,मुक्ताबाई भोसले हायस्कूल, नागझरी या शाळांची निवड करण्यात आली होती.
   पुस्तक वितरणकामी संस्थेचे अध्यक्ष विजय कासुर्डे,उपाध्यक्ष एकनाथ जगताप, सचिव चंद्रकांत शिंदे, खजिनदार बाळासाहेब पवार इतर  विश्वस्त विश्वनाथ पवार,जिजाबा पवार,चंद्रकांत ढमाळ,रवींद्र केंजळे, गजानन धुमाळ, राहुल जगदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळांची निवड, पुस्तके खरेदी आणि वितरणासाठी वर्णे
हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.  विविध सामाजिक संस्थांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शाळांना सहकार्य करण्याचे आवाहन  उद्योजक श्रीकांत पवार ,चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांनी केले. शाळेस पुस्तके भेट दिल्याबद्दल विद्यालयातील शिक्षक अशोक घाडगे यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला