जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
बापू वाघ - Fri 3rd Jul 2026 06:50 pm
- बातमी शेयर करा
पाचवड:जावली तालुक्यात एकमेव रजिस्टर्ड असलेल्या जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासू भूमिका आणि निष्पक्ष वृत्तांकन यामुळे सादिक सय्यद यांनी पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुका पत्रकार संघ अधिक सक्षमपणे कार्य करेल, पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल तसेच पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता पवार यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कार्याध्यक्षपदी संदीप माने,उपाध्यक्षपदी संतोष मालुसरे,तर सचिवपदी विनोद वेंदे यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर सादिक सय्यद यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. पत्रकारांची एकजूट कायम ठेवून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी तसेच समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघाचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर,जेष्ठ पत्रकार दत्ता पवार,महेश बारटक्के,संजय शेलाटकर,बापू वाघ,मोहसीन शेख,विशाल जमदाडे,जुबेर शेख,आदी सदस्य उपस्थित होते.
त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 3rd Jul 2026 06:50 pm










