मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू
Satara News Team
- Thu 21st Nov 2024 11:00 am
- बातमी शेयर करा
पाटण : मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पाटण तालुक्यातील उमरकांचन गावाजवळ घडली. ओंकार रमेश भिंगारदेवे (वय १७) असे बुडून मृत्यू झालेल्या मृत मुलाचे नाव आसुन. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने संपूर्ण ढेबेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओंकार भिंगारदेवे काही मुलांसमवेत मंगळवारी दुपारी गावाजवळच्या वांग नदीपात्रात पोहायला गेला होता. त्यांच्यापैकी कुणालाही पोहता येत नव्हते. मराठवाडी धरणाच्या जलाशयाचा हा भाग असून, पूर्वी त्याठिकाणी केलेल्या खोदकामामुळे पाण्यात खोल खड्डे आहेत. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ओंकार बुडाला. तेथे असलेल्या मुलांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना त्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, तो आढळून आला नाही.
दरम्यान, सकाळी कराडहून आलेल्या मच्छीमारांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जलाशयातील खड्ड्यात शोध मोहीम राबवून ओंकारचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्याचा मृतदेह कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ओंकार ढेबेवाडी येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रशांत चव्हाण, नवनाथ कुंभार, धीरज मुळे, गणेश किर्दत, पोलिस पाटील विष्णू पुजारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
स्थानिक बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 21st Nov 2024 11:00 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 21st Nov 2024 11:00 am
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 21st Nov 2024 11:00 am
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 21st Nov 2024 11:00 am
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 21st Nov 2024 11:00 am
संबंधित बातम्या
-
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 21st Nov 2024 11:00 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 21st Nov 2024 11:00 am











