साताऱ्याचा खासदार झालो असतो तर सातारा जिल्ह्याचा कायापालट केला असता-आ. शशिकांत शिंदे

कोरेगाव मतदार संघातील कार्यकर्त्यांचा नवी मुंबईत संवाद मेळावा

कोरेगाव -सातारा लोकसभेला शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आदेश दिला आणि मी निवडणुकीला उभा राहिलो सातारा जिल्ह्यासाठी मी कायमस्वरूपी विकास कामासाठी प्रयत्नशील होतो आणि आहे शरद पवार साहेबांना विनंती केली होती की आमच्या सुशिक्षित मुलांना नोकरीची संधी मिळावी यासाठी आयटी पार्क पाहिजे त्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे तसेच सातारा मध्ये मेडिकल कॉलेज साठी मी जलसंपदा मंत्री असताना पंचवीस एकर जमीन हस्तांतर केली आणि मेडिकल कॉलेजचे काम चालू करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करून मेडिकल कॉलेज आणले परंतु याचे श्रेय सत्ताधारी घेत आहेत परंतु मेडिकल कॉलेज कोणी आणले हे मतदारांना माहित आहे साताऱ्याचा खासदार झालो असतो तर सातारा जिल्ह्याचा कायापालट केला असता असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले 

 संग्राम थोपटे म्हणाले-महागाई रोखण्यामध्ये केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे असफल ठरलेले आहे एकीकडे महिलांसाठी तात्पुरती योजना आणून मते मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे जी महिला मतदार करणार नाही तिला दम देऊन लाभ मिळणार नाही असा दम देण्याचे काम कोरेगावचे स्थानिक आमदार करत आहेत खऱ्या अर्थाने राज्यातील महिला सुरक्षित आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे लोकसभेच्या निकालानंतर त्यांना लाडकी बहीण आठवायला लागली आहे दुसरीकडे महागाई करून जनतेची वसुली करण्याचे कामखोके सरकार करत आहे यासाठी अनेक महिला व मतदार बंधूंना दाखवली जात आहे आपण मतदार सुज्ञ व सुशिक्षित आहात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना पाठबळ दिले पाहिजे शशिकांत शिंदे हे एकमेव आमदार सर्वसामान्यांसाठी मंत्रालयामध्ये आवाज उठवत असतात त्यांना बहुमताने आपण निवडून दिले पाहिजे मतदारसंघातील स्वाभिमानी व सुज्ञ असलेली जनता कधीही महायुतीच्या उमेदवाराला बळी पडणार नाही आपल्या स्वार्थासाठी पक्ष फोडणारे व पक्ष बदलणारे तिकीट मिळवून इकडून तिकडे उड्या मारणारे आमच्यावर टीका करून मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु खोटे बोलणाऱ्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन संग्राम थोपटे यांनी केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त