शंभूराज देसाईंनी दिले आदित्य ठाकरेंना आव्हान; माझ्या पाटण मतदार संघातून लढून दाखवा

सातारा : गेले 6 महिने आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरे काहीच बोलत नाही. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतुन उभं राहण्याचं आव्हान दिल आहे.
 मात्र, माझं आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं, असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले होते. त्यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी ते पुढे म्हणाले, आदित्या ठाकरेंना स्वतः ला आमदार होण्यासाठी वरळीतल्या दोन आमदारांच तिकीट कापुन विधानपरिषदेची आमदारकी द्यावी लागली. एका आदित्य ठाकरेंना निवडुन आणण्यासाठी त्यांना दोन आमदारकी द्यावी लागली, ही ज्यांची वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देणं, हे हास्यास्पद आहे. असे ही शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले आहे. दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिल्याने आता चांगलेच राजकारण तापलेले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला