जयहिंदचे पाठबळ हुतात्मा कुटुंबीयांना बळ देणारे :-नासिर मनेर

सातारा: त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे तरच समाजाची प्रगती होईल, जयहिंदने हाती घेतलेले कार्य आदर्शवत असून, सैनिकांच्या तसेच शहीद सैनिक परिवारासाठी जयहिंदचे असणारे पाठबळ येणाऱ्या काळात त्या सर्व कुटुंबांना बळ देणारे असून,या कुटुंबाना मानसिक आधाराची मदत करणाऱ्या या संस्थेने सुरु केलेलं कार्य अभिमानास्पद आहे, असे गौरवोदगार महसूल उपायुक्त नासीर मणेर यांनी काढले.
       सातारा येथील शाहू कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते,यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या विरमाता अनुराधाताई गोरे,लेफ्टनंट राजेंद्रकुमार जाधव उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, सुभेदार मेजर सतीश तपासे 22 बटा. NCC सातारा जयहिंद फॉउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने,राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे संचालक डॉ. नितीन कदम, हनुमंत चिकणे, डॉ. केशव राजपुरे, तुषार घोरपडे,मनीषा अरबूने, स्वप्नील मांढरे, यशोधन संस्थेचे रवी बोडके, व्यसनमुक्ती जिह्वाध्यक्ष विलासबाबा जवळ,संतोष कदम यांची उपस्थिती होती, 
    पुढे बोलताना नासीर मणेर म्हणाले,आजचा कार्यक्रम पाहून खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा देशासाठी असलेला त्याग दिसून येत आहे,विधवा पत्नीना देखील जगण्याचा हक्क आहे, त्यामुळे जुनी बंधन बदलली पाहिजेत जयहिंद जवानांच्या सोबतच विधवा प्रथाबंदीसाठी सुरु केलेले कार्य अभिमानस्पद असून त्याकरिता लागणारी सर्वोतपारी मदत करणार असल्याचे सांगितले. 
     विरमाता अनुराधाताई गोरे यावेळी म्हणाल्या, पुढील काळ कठीण आहे त्यामुळे आव्हान पेलण्यासाठी सजग राहून यशस्वी व्हा,ज्या देशाला इतिहास असतो त्याच देशाला भूगोल बदलता येतो, त्यामुळे सर्वांनी ज्वालामुखी बनून जगा, स्वतःच्यात देशभक्ती जागृत ठेवा जेणेकरून देश प्रगती करू शकेल, 
       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयहिंद फॉउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जयदीप भोसले, उपाध्यक्ष दत्तात्रय साळुंखे सचिव उमेश मोरे, महिला जिल्हा प्रमुख उर्मिलाताई कदम, मकरंद देशमुख, रविंद्र कदम,माधुरी फाळके, सुवर्णा जाधव, नीता भोसले,स्नेहलता जगताप यांचेसह जावळी वाई कराड खटाव बारामती चंद्रपूर वर्धा पुणे या सर्वां टिमने प्रयत्न केले.प्रस्ताविक हनुमंत मांढरे ,सूत्रसंचालन डॉ नितिन कदम व अशोक लकडे यांनी, तर आभार जयदीप भोसले यांनी मानले,

(एका विरमातेने आपल्या हुतात्मा सुपुत्राची चित्रफित पहिली तेव्हा तीने अरे राजा तुझं कोतुक कोणाला दाखवू असे म्हणून फोडलेला हंबरडा पाहून अख्खे सभागृह भावनिक होऊन अश्रु ढाळत होते.)

(जयहिंदच्यावतीने 23 हुतात्मा सैनिक परिवाराचा सन्मान)
        जयहिंदने  हुतात्मा सैनिक सुदाम कदम, अशोक इंगवले, सुधीर निकम, चंद्रकांत जाधव, प्रशांत भोसले, तेजस मानकर, विजयकुमार जाधव, सुरज यादव, विजय कोकरे, विजय शिंदे, विपुल इंगवले, सुरज शेळके, अजय ढगळे, प्रशांत जाधव, वैभव भोईटे, सुनील सावंत, समाधान निकम, संतोष निकम, मयूर यादव, सिद्धाप्पा कोरे, शंकर हुगलिकर, नवनाथ भांडे या परिवाराचा सन्मान केला.


 (विरपत्नी देखील देशसेवेत दाखल)
"सातारा येतील विरपत्नी भाविका वंजारी यांची CISF मधे शिपाईपदी तसेच कोल्हापूर येथील विरपत्नी प्रियांका खोत यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झाली".


जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांची मिळणार जयंहिंदला साथ
"येणाऱ्या काळात सैनिक परिवाराला शासकीय पातळीवर लागणारी सर्व शासकीय मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस प्रमुख समीर शेख यांनी उपायुक्त नासिर मणेर यांच्या माध्यमातून दिला"

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त