कळंबी ता.खटाव येथील आरंभ अंतर्गत पालक मेळावा उत्साहात.

खटाव  : कळंबी ता.खटाव येथील विकास सेवा सोसायटी च्या इमारतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या मा. सुनिताताई कदम आणि सिद्धनाथ पतसंस्थेच्या मा.संचालिका सौ.सोनियाताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रयत्नातून पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ० ते ३ वयोगटातील बालकांचे आहार आणि संगोपनाची काळजी तसेच ० ते ५ वयोगटातील बालकांची बौध्दीक, शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक घेण्यात येणारी काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अंगणवाडीतील बालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 


        यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मार्गदर्शन तसेच आपुलकीच्या काही सुचना दिल्या. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मा.पाटोळे मॅडम, मा.गायकवाड मॅडम, कळंबी गावच्या मा.सरपंच सौ.मिनाज मुलाणी, मा.उपसरपंच सतिश काळे, मा.चेअरमन हरिदास सावंत, पोलिस पाटील सगरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त