श्रीपतराव पाटील हायस्कूल आणि करंजे नगरी दुमदुमली विठुरायाच्या नामस्मरणात..

सातारा: सातारा शहरानजीक करंजेपेठेतील शिक्षण प्रसारक संस्था संचलित,श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु.कॉलेज करंजेपेठच्या इयत्ता ५ वी ते ७ वीच्या तुकडीतील विद्यार्थी- विद्यार्थीनींनी वारक-यांचा पोशाख परिधान केला तर त्यांच्या मधीलच काही मुला- मुलींनी विठुराया,रुक्मिणी, संत जनाबाई व मुक्ताबाई यांची रुपे धारण केली होती..


     कार्यक्रमाच्या प्रारंभी दिंडीचे पूजन  विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर वसावे, यशवंत गायकवाड,सॊ. सुनिता देशमुख,सॊ.कविता हेंद्रे आणि सर्व सहकारी शि

क्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि दिंडीतील सेवेकरी विद्यार्थी विद्यार्थीनींच्या हस्ते झाले...
    सर्व करंजे नगरी मधून इयत्ता ५ वी ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची विद्यार्थी रुपी "वारकरी दिंडी "करंजे नगरीतून फिरली...त्यामध्ये बाल कीर्तनकार श्रीमद गुजर याने छोटे किर्तन सादर केले.. विद्यालयातील मुला-मुलींनी टाळ मृदंगाच्या साथीने हरी नामाचा गजर केला तर काही मुलींनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला त्यामुळे संपूर्ण करंजे नगरी विठुरायाच्या  नामस्मरणात दंग होऊन गेली..


   या विद्यार्थी रुपी वारकरी दिंडीचे कौतुक शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सलताई डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप सचिव तुषार पाटील शालासमितीच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण माजी अध्यक्ष प्रतापराव पवार,संचालिका हेमकांची यादव, संचालक चंद्रकांत पाटील, धंनजय जगताप, रविंद्र जाधव तसेच संस्था व शाळेचे हितचिंतक व करंजे ग्रामस्थांनी केले... आणि विद्यार्थी दिंडीच्या कार्यक्रमाची सांगता झाली...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त