पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या संदर्भात आ. जयकुमार गोरे यांना निवेदन.

माण : आगामी हिवाळी अधिवेशनात पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या मागण्या मांडण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी मोर्च्याचे आयोजन दि. 22 डिसेंबर रोजी करण्यात आले असून मागण्या संदर्भातील निवेदन माण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने माण चे आ. जयकुमार गोरे यांना देण्यात आले.
     नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पोलीस पाटील यांच्या मागण्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवून त्यांच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचू असे सांगितले. 
   गाव पातळीवरील काम करणाऱ्या पोलीस पाटील हा मराठी शासनाचा महत्त्वाचा दुवा असून याच पोलीस पाटलाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे त्यामुळे पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच पोलीस पाटलांच्या मागण्या शासनासमोर ठेवण्यात येणार आहेत. 
     यावेळी सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष महेशराजे शिंदे पाटील, माण तालुका अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, पोलीस पाटील अवधूत जगदाळे, लखन बोराटे, बापू सस्ते, वैभव ढेंबरे, रवींद्र सस्ते, मिलिंद देवकुळे, विशाल गुरव  आदी उपस्थित होते. 


 
पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या.. 

१) पोलीस पाटलांना दरमहा 18 हजार रुपये मानधन द्या. 
२)निवृत्तीचे वय 65 वर्ष करावे. 
३) निवृत्तीनंतर पाच लाख रुपये मिळावे. 
४) ग्राम पोलीस पाटील अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य द्या. 
५) नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर पुढे बंद करा. 
६) पोलीस पाटलांना पाच लाखाचा विमा उतरावा व त्याचे हप्ते शासनाने भरावे. 
७) प्रवास भत्ता व स्टेशनरी खर्चासाठी मानधन सोबत दरमहा 3 हजार द्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला