चहा ची तलप , रिक्षा वर झडप".
बस चालू ठेवून चालक चहा प्यायला गेला काही वेळात झाली दुर्दैवी घटना..
जुबेर शेख - Sat 22nd Jul 2023 10:34 am
- बातमी शेयर करा
सातारा: बस चालू ठेवून चालक चहा प्यायला गेला काही वेळात झाली दुर्दैवी घटना.. *सातारा प्रतिनिधी-जुबेर शेख* सातारा शहरातील राजवाडा बस स्थानकावरील कर्नाटक राज्यातील बस उता-यास लागल्याने थेट स्थानकासमाेर रिक्षावर जाऊन आदळली. यामुळे दाेन रिक्षांचा चूराडा झाला. या घटनेत रिक्षा चालक जखमी झाला आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेली माहितीनूसार राजवाडा बस स्थानकावर कर्नाटक राज्याची बस उभी हाेती. ही बस चालू ठेऊन चालक चहा पिण्यासाठी गेले हाेते. बसचा हॅन्ड ब्रेकफेल झाल्याने बस उता-यावर लागली. बसस्थानाकाच्या बाहेरील रिक्षा थांब्यावर नेहमीप्रमाणे रिक्षांच्या रांगा लागल्या हाेत्या. या बसने दाेन रिक्षांना धडक दिली त्यात दाेन्ही रिक्षांचा चूराडा झाला. दरम्यान बस चालकाने पळत येऊन बसमध्ये बसल्याने पुढचा अनर्थ टळला अशी माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान जमावाने दुसऱ्याच कर्नाटक गाडीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण केली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सातारा पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 22nd Jul 2023 10:34 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sat 22nd Jul 2023 10:34 am













