सज्जनगड घाटाच्या दरीमध्ये युवती कोसळली बचाव कार्य वेगाने राबवून युवतीचे वाचवले प्राण
- Satara News Team
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सज्जनगड ठोसेघर मार्गावरील बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंट परिसरात एक युवती दरीत कोसळली . सेल्फी काढण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची चर्चा असून सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे . ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती शिवेद्रसिंहराजे रेस्कु टीम व सातारा तालुका पोलिसांनी बचाव कार्य वेगाने राबवून त्या युवतीचे प्राण वाचवले आहेत मात्र संबंधित युवतीचे नाव समजू शकलेले नाही तिला अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
याबाबतची अधिक माहिती अशी स्कॉर्पिओ वाहनांमधून पाच पुरुष व दोन युवती ठोसेघरच्या दिशेने जात होते .सज्जनगड घाटामध्ये बोरणे गावच्या हद्दीतील मंकी पॉईंटवर त्यातील एक युवती पावसामध्ये खाली उतरली .सेल्फी काढण्याच्या नादामध्ये ही युवती सुमारे 100 फूट खाली कोसळली अशी परिसरात चर्चा होती . त्यावेळी गाडीतील सर्वांनी एकच गोंधळ केला ही घटना सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे .
या घटनेची माहिती कळताच ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, समाधान काकडे, प्रतीक काकडे, रामचंद्र चव्हाण, तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनचे अविनाश मांडावे व सागर मदने तातडीने घटनास्थळी दाखल झाले . खोल दरीमध्ये दोरखंड टाकून या कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला सुखरूपपणे वर आणले .अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासांमध्ये हे बचाव कार्य करण्यात आले .मात्र दरीत कोसळल्याचा त्या युवतीला प्रचंड धक्का बसला होता तसेच त्यामध्ये ती जखमी झाली होती. संबंधित युवतीला अधिक उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घाटातील प्रवासामध्ये पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे
शिवेद्रसिंहराजे रेस्कु टीम सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांबे उपनिरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोर्डे अपघात विभागाचे विशाल मोरे आणि ठोसेघर व्यवस्थापन समितीचे अविनाश मांडवे सागर मदने यांचे मोठे सहकार्य लावले
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
संबंधित बातम्या
-
मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
क्रेनच्या धडकेत दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
यवतेश्वर घाटात शनिवारी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. ....पोलीसाची भीती नाहीच
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
फलटण मध्ये दुचाकीला डंपरची धडक एकाचा मृत्यू
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
शिवथर मध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे आगमन
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
जावली गावाच्या हद्दीत एसटीची दोन चाके निखळली.
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm
-
किडगाव येथे रात्री बिबट्याकडून शेळी फस्त .
- Sat 3rd Aug 2024 08:41 pm