यवतेश्वर घाटात शनिवारी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. ....पोलीसाची भीती नाहीच

सातारा : यवतेश्वर घाटात शनिवारी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. पुण्याचा युवक दारू पिऊन चारचाकी गाडी चालवत असताना गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली. देव बलवत्तर म्हणून युवकाचे प्राण वाचले. सकाळी घाटात वाहनांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.


पुण्याहून कास-यवतेश्वरला फिरण्यासाठी एक युवक आला होता. सातारच्या दिशेने जाताना त्याने दारूचे सेवन केले. यवतेश्वर घाटातील गणेशखिं डच्या परिसरात त्याचा चारचाकी गाडीवरील ताबा सुटला. आणि गाडी झाडाला जाऊन धडकली यात युवक जखमी झाला  या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून गाडी (एम एच १२ टी वाय ६६७८) ताब्यात घेतली. त्याला रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.


सकाळची वेळ असल्याने घाटात वाहनाची संख्या कमी होती. यामुळे मोठा अनर्थ टळला कोणतीही घटना झाली की मग तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात परंतु घटना होऊ नये यासाठी कोणतीही खबरदारी या ठिकाणी घेतली जात नाही


तालुक्यातील पोलीसाची भिती नाहीच 
 यवतेश्वर कास परिसरात गेल्या काही दिवसांपासून कसलाच पोलिसांचा धाक पर्यटक तसेच स्थानिक हुल्लडबाज युवकांवर राहीलेला दिसत नाही .यवतेश्वर परिसरात तर खुले आम रस्त्याच्या कडेला मध्यपान केलं जात आहे. सायंकाळचे सहा वाजले की रात्रीच्या अकरा पर्यंत या ठिकाणी आयाराम गयाराम ची मेहफिल बसलेली असते. यातच प्रेमीयुगल यांची कमी नाही. यातून एखादी घटना घडल्यावर तालुका पोलिसांना जाग येणार का असा सवाल स्थानिक करत आहे. इलेक्शन ड्युटी च्या नावाखाली ज्या ठिकाणी वर कमय होते या ठिकाणीच पोलीस दिसत असल्याचं बोललं जात आहे.
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त