किडगाव येथे रात्री बिबट्याकडून शेळी फस्त .

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण .

 किडगाव :  किडगाव तालुका सातारा येथील दत्तनगर भिलारवाडी येथे रविवारी रात्री बिबट्याकडून गोठ्यात बांधलेली शेळी फस्त करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
   किडगाव दत्तनगर भिलारवाडी येथे राहणारे शेतकरी हरिश्चंद्र ज्ञानदेव इंगवले हे आपल्या शेतात राहतात. घराच्या पाठीमागे गुरे बांधण्याचा त्यांचा गोठा आहे. रविवारी रात्री या गोठ्यात बिबट्या आपल्या दोन पिल्लांना घेऊन आल्याचे दिसत असून गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून बिबट्याने शेळी फस्त केली . सकाळी इंगवले झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. घराच्या आसपास रात्री पडलेल्या पावसामुळे बिबट्याच्या पायाचे ठसे या ठिकाणी दिसून आले.मोठ्या बिबट्याच्या पायाच्या ठश्या बरोबर अन्य दोन पिल्लांच्या पायाचे ठसे ही या ठिकाणी आढळून आले. किडगाव मध्ये प्रथमच बिबट्या आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती असून या बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाने ताबडतोब करावा अशी मागणी करण्यात आली आहे. माझे नुकसान झाले असून वन विभागाने ताबडतोब याची नुकसान भरपाई द्यावी अशी ही मागणी इंगवले यांनी केली आहे. सध्या सोयाबीन काढणीस आले असून शेतामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर शेतात काम करणाऱ्या बायकांनी या बिबट्याची धास्ती घेतली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मेरूलिंग धावडशी परिसरात गेल्या महिन्यापूर्वी बिबट्या चे दर्शन झाले होते. त्याने युवकावर हल्ला केला होता .आज बिबट्याकडून किडगाव येथे शेळी फस्त करण्यात आली . उद्या एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाल्यास त्याला जबाबदार कोण ? यासाठी वन विभागाने पावले उचलून या बिबट्याचा बंदोबस्त करावा.

संतोष बापूराव इंगवले. 
उपसरपंच किडगाव.

 

 

 

 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला