‘स्वाभिमान दिन' शाही उत्साहात किल्ले अजिंक्यतारा जयघोषाने दुमदुमला, भगवे फेटे आणि ढोल ताशांचा गगनभेदी निनाद, शाहूमय वातावरण

सातारा ; कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे स्वराज्याची राजधानी किल्ले अजिंक्यतारा स्वाभिमान दिवसांच्या स्वागताला सज्ज होती. पहाटेपासूनच शिवप्रेमी गडाच्या प्रवेशद्वारावर  हजर होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शाहु महाराज की जय अशा घोषणा देत, तुतारींच्या निनादात, ढोल पथकाच्या वाद्यात, स्काऊट गाईड, एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या परेडमध्ये शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्यताऱयावर छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन तथा सातारा स्वाभिमान दिन उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शाहु महाराजांची सजवलेली पालखी गडाच्या मुख्य दरवाजापासून मंगळाई देवीपर्यंत वाजतगाजत काढली. राजसदरेवर पुन्हा पालखीचे आगमन वाजतगाजत झाले.

गेली 13 वर्ष राजधानी साताऱयात किल्ले अजिंक्यताऱयावर शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने स्वाभिमान दिन साजरा केला जातो. याहीवर्षी मोठा उत्साह सोहळय़ात सकाळपासून पहायला मिळाला. पहाटेपासून गडाच्या प्रवेशद्वार ते मंगळाई देवी, राजसदर येथे भगवे फेटेधारी शिवभक्तांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावल्याने वातावरण शिवमय झाले होते.  

छत्रपती शाहु महाराजांची आणि मंगळाई देवीची विविधत भेट सोहळा पार पडल्यानंतर तेथून पुन्हा परत राजसदरेवर छत्रपती शाहु महाराजांची पालखी आणण्यात आली. गुरुकुल स्कूलच्या एनसीसी कॅडेट आणि स्कॉऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला मानवंदना दिली. राजसदरेवर राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, माजी उपनगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, माजी नगरसेवक प्रशांत आहेरराव, धनंजय जांभळे, शेखर मोरे-पाटील, उद्योजक सागर भोसले, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, जायटंस् ग्रुपचे ऍड. नितीन शिंगटे, रविराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या रेणू येळगावकर, सहेली ग्रुपच्या अंजली शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल राजपूरोहित, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे, सागर राजेमहाडिक, अविनाश कोळपे, मनोज देशमुख, रवी पवार, अजित साळुंखे, रविराज गायकवाड, मुक्तार पालकर, अजय जाधवराव, अभिजित बरटक्के, सतीश ओतारी, अजय जाधवराव, सुनील मोरे-पाटील, विश्वास मोरे, दया शितोळे यांच्यासह मान्यवरांचा तसेच शेकडो सातारकरांचा सहभाग होता. त्याच बरोबर युवा करिअर व कमांडो ऍकॅडमीचे विद्यार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग होता.

सुनील मोरे यांचे बहारदार सूत्रसंचालन  
सुनील मोरे-पाटील यांच्या सूत्रसंचालनामुळे सकाळपासून राजसदरेवर वातावरण निर्मिती केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर, संस्थापक सुदामदादा गायकवाड, प्रवीण धुमाळ, शेखर तोडकर, सचिन जगताप, अमोल नलावडे, नितीन सूर्यवंशी, अमोल काटकर व सदस्यांनी चांगले काम केले. नितीन सुर्यवंशी यांनी आभार मानले.

स्वाभिमान दिनाला उपस्थिती लावणारे पहिले जिल्हाधिकारी
सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे सकाळी गडावर पोहोचले. स्वाभिमान दिनाला उपस्थिती लावणारे हे पहिलेच जिल्हाधिकारी आहेत. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने दीपक प्रभावळकर, सुदामदादा गायकवाड यांनी त्यांचे स्वागत गेले. मंगेश काशिद यांनी त्यांना भगवा फेटा बांधला. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराजांच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकाऱयांच्या सहभागामुळे सर्वच उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.

 

महापुरुषांचा इतिहास रुजवू-राजेंद्र चोरगे


बालाजी चॅरिटेबलचे संस्थापक राजेंद्र चोरगे म्हणाले, ज्या पद्धतीने शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे कार्यकर्ते काम करतात ते वाखाणण्याजोगे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज यांचे विचार युवकांच्यात रुजले पाहिजेत. त्यांनी महिलांचा सन्मान करायला शिकवले, धर्माभिमान शिकवले. पाण्याचे व्यवस्थापन शिकवले. त्यांचे विचार तळागाळात पोहोचण्याचे काम झाले पाहिजे. शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अखंड हिंदूस्थानचा स्थापना दिवस आहे-दीपक प्रभावळकर
छत्रपती शिवाजी महाराज हा आपला ध्येयमंत्र आहे. आजचा दिवस छत्रपती शाहू महाराज की जय असा आहे, अखंड हिंदूस्थानचा स्थापना दिवस आजचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे सातारची जन्मगाथा आहे. स्वाभिमान दिवस 13 वर्षापूर्वी केवळ पाचच जणांनी साजरा करण्यास प्रारंभ केला. आज पाचाचे पन्नास, पन्नासाचे पाचशे होत आहेत. याचा अभिमान आहे. हा उपक्रम कोणा एकटय़ाचा नाही, सर्व सातारकरांचा आहे तो उत्साहात साजरा करुया, असे शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला