ट्रॅक्टरखाली सापडून ग्रा.पं. सदस्याचा मृत्यू
Satara News Team
- Wed 8th Jan 2025 10:42 am
- बातमी शेयर करा
कोरेगाव : हार्वेस्टरद्वारे तोडलेला ऊस पाठीमागून गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून एका ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतशील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबवडे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथे घडली आहे. अरुण धर्माजी जाधव (वय ५१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मंगळवारी रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार रात्री साडेआठच्या सुमारास अंबवडे संमत कोरेगावच्या डोंगर नावाच्या शिवारात किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासाठी अरुण जाधव यांच्या शेतातील उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे गतीने सुरू होती. ही तोडणी सुरू असताना या हार्वेस्टरद्वारे तोडलेल्या उसाच्या कांड्या एका ट्रॅक्टरद्वारे गोळा करून ट्रॉली भरली जात होती.
लगतच अंधारात अरुण जाधव हे इतर कांड्याही वेचत होते. हे काम सुरू असताना अचानक कांड्या गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरखाली ते सापडल्यामुळे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने कोरेगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. तेथून त्यांना सातारा सर्वसाधारण रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत येथील पोलिसात झालेली नव्हती. मृत पावलेले अरुण जाधव हे अंबवडे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते. प्रगतशील शेतकरी आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंबवडे संमत कोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
accident
satara
koregav\
koregav
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 8th Jan 2025 10:42 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 8th Jan 2025 10:42 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 8th Jan 2025 10:42 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 8th Jan 2025 10:42 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 8th Jan 2025 10:42 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 8th Jan 2025 10:42 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 8th Jan 2025 10:42 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Wed 8th Jan 2025 10:42 am













