शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी : कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष
कृणाल खंदारे
- Tue 9th Aug 2022 09:55 am
- बातमी शेयर करा
सातारा : शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने मल्हारपेठ येथील कार्यकर्त्यांनी साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानी येऊन फटाके वाजवून जल्लाेष केला. शंभूराज देसाई यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ दुसऱ्यांदा पडली आहे. देसाई यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी मल्हारपेठ येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात येऊन आनंद साजरा केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट व भाजपकडून प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), चंद्रकांत पाटील (कोथरूड), सुधीर मुनंगटीवार (बल्लारपूर), विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), मंगलप्रभात लोढा (मुंबई) यांनी शपथ घेतली. शिंदे गटाचे संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दूल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई (पाटण) यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 9th Aug 2022 09:55 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 9th Aug 2022 09:55 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 9th Aug 2022 09:55 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 9th Aug 2022 09:55 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 9th Aug 2022 09:55 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 9th Aug 2022 09:55 am












