डीजेच्या कर्ककर्कश आवाजाने घेतला वाई येथील तरुणाचा बळी

डीजेच्या कर्ककर्कश आवाजाने घेतला वाई येथील तरुणाचा बळी

वाई : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वाईमधील तरुणाचा बळी घेतला आहे. या तरुणावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेमंत दिलीप करंजे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शुक्रवारी १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाई शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये चार ते पाच डीजेंमध्ये आवाजाची चुरस लागली होती. त्यामुळे वाई शहर दणाणून गेले होते. मिरवणूक वाईच्या किसन वीर चौकात आली असताना डीजेच्या आवाजाची जणू स्पर्धा निर्माण झाली होती.

याचवेळी हेमंत दिलीप करंजे हा मिरवणूक पाहत थांबला होता. डीजेच्या आवाजाच्या दणक्याने चक्कर येऊन तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने वाईहून पुण्याला नेण्यात आले. तेथे त्याच्यावर पंधरा दिवस उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अशा या डीजे स्पर्धकांवर पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सर्व वाईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला