साताऱ्यास बेडग गावचा लॉंगमार्च येतोय
Satara News Team
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
- बातमी शेयर करा
सातारा : "ज्या गावात बाबासाहेबांचे नाव चालत नाही. ते गाव आम्हाला देखील चालत नाही." असा नारा देत बेडगच्या आंबेडकरी बांधवांनी गाव सोडुन लाँगमार्च सुरू केला आहे. साताऱ्यास पोहचत असल्याने त्यांच्या स्वागतास अनुयायी उत्सुक आहेत.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून माणगांव येथून सुरू झालेला लॉंगमार्च कराडवरून साताऱ्यास येत आहेत.तेव्हा नेतेमंडळी त्यांची सोय करण्यामध्ये मशगुल असून प्रत्येकांनी मदत कार्यामध्ये पुढे आले पाहिजे. असेही आवाहन आंबेडकरप्रेमी करीत आहेत.
याअगोदर लॉंगमार्च काढला होता.सरकारने बोळवण केल्याने पुन्हा मुंबईच्या दिशेने लॉंगमार्च सुरू करण्यात आलेला आहे. "ज्या गावात बाबासाहेबांचे नाव चालत नाही. ते गाव आम्हाला देखील चालणार नाही." अशी रोखठोक भूमिका घेऊन सांगली जिल्ह्याच्या प्रशासनाचा धिक्कार करत आणि झोपेचे सोंग घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील बेडग गावातील स्वाभिमानी आंबेडकरी जनता बेडग पासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढत आपल्या लहान पोराबाळांना व वयोवृद्ध लोकांना घेऊन मंत्रालयापर्यंत थेट प्रवास करण्याचा निर्धार बेडग गावातील स्वाभिमानी आंबेडकरवाद्यांनी घेतलेला आहे.या लॉंगमार्चमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा चिमुकल्याने हातात घेऊन उद्याचा क्रांतिकारी भीमसैनिक अन्यायावरती प्रहार करणारा त्याच्या येत्या पिढीचा नेतृत्व करणारा नवा युवक म्हणून अन्यायाविरुद्ध झुंज देणारा एक चिमुकला आणि एक चिमुकली बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन या लॉंग मार्चमध्ये आपल्या आई - वडिलां सोबत व्यवस्थित ओटावर शब्द न फुटणाऱ्या आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत सामील झालेली आहेत. प्रत्येक तरुण आणि वयोवृद्ध माणसाच्या हातामध्ये बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन बेडग गावाच्या मध्यभागातून बाबासाहेबांचा जयघोष करत स्वाभिमानी आंबेडकरी समाजाने आपल्या घराच्या दारांना कुलूप लावून साहित्य डोक्यावर घेत प्रवास सुरू केला आहे.बेडग गावातील जातीवादी सरपंच उमेश पाटील यांनी आंबेडकरी वस्तीच्या समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने असलेली स्वागत कमान बुलडोझरने जमीनदोस्त केली होती. स्थानिक आंबेडकरी समाजाने सर्व प्रशासकीय कार्यालयाला पत्र व्यवहार करून देखील कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून बेडगमधील बौद्ध बांधव मंत्रालयापर्यंत थेट प्रवास करणार आहेत.याबाबत कोणताच लोकप्रतिनिधी या आंदोलन कर्त्याच्या व्यथा जाणून घेण्यास तयार नाही.महाराष्ट्र सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची मध्यस्थीची भूमिका घेण्यास ठाम नाही. सांगली जिल्ह्यातून
अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघ विधानसभेच्या जागेमधून सुरेश खाडे नावाचे आमदार निवडून आले आहेत. त्यांनी पालकमंत्र्याचे सूत्रसुद्धा त्यांच्या हातात आहेत.तेही जातीवादी व्यवस्थेच्या म्हणजेच भाजपचे आहेत.सांगलीचे खासदार संजय पाटील देखील बीजेपीचे खासदार आहेत त्यामुळे बेडग गावातील सरपंच उमेश पाटील यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही.मिरज भागातून मुंबईच्या दिशेकडे आगेकूच करणाऱ्या भीमसैनिकांना बळ देण्यासाठी आता आंबेडकरी समाजाने सज्ज झाला आहे.महाराष्ट्र शासनाचे डोके ठिकाणावर आणले पाहिजे. तसे झाल्यास हा विजय बेडग गावचा नाही तर संपूर्ण आंबेडकरी जनतेचा होईल.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करायला पाहिजे.नाहीतर महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे वास्तव आहे. आज बेडग गावचा प्रश्न आहे. तसाच प्रश्न गावातील खेड्या-खेड्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा गटातटास तिलांजली दिली पाहिजे.बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची कमान जमिनीदोस्त केल्यानंतर जुलै २०२३ दरम्यान बेडग गाव ते मंत्रालयापर्यंत लॉन्ग मार्च करण्याचा निर्धार या गावातील भीमसैनिकांनी घेतला व लॉन्ग मार्च प्रवास देखील सुरू होता. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली होती.त्यांनी कमान जमीनदोस्त केली आहे.त्याच ठिकाणी पुन्हा कमान उभारली जाईल. असे आश्वासन देत आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्याचे सांगितले होते. मात्र,सदरची कमान पुन्हा बांधण्यासाठी सरपंच उमेश पाटील यांनी राजकीय खेळी खेळून ग्रामसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेली कमान उभी करण्याविरोधात बहुमताने ठराव ना मंजूर केला आहे. जर ज्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चालत नसेल तर तसले गाव आम्हाला देखील नको.अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही गाव सोडून मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत. आता लढाई आरपारची असल्याची भावना अनुयायांमध्ये आहे.
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 18th Sep 2023 04:27 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 18th Sep 2023 04:27 pm













