आम आदमी पार्टीच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी सरदार (सागर) भोगांवकर यांची नियुक्ती
Satara News Team
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा : आम आदमी पार्टीच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी सरदार (सागर) भोगांवकर यांची विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनमंत्री संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पक्ष कार्यकारीणीसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, उपजिल्हाध्यक्ष रतन पाटील, महेंद्र बाचल, सचिव निवृत्ती शिंदे, प्रसिद्धी प्रमुख मारुती जानकर, जिल्हा खजिनदार विजयकुमार घोतमल, जिल्हा संघटक ऍड. धीरज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संदीप देसाई म्हणाले, भोगांवकर यांनी आम आदमी पक्षाचे काम करीत असताना पक्षाची ध्येय, धोरणे सातारा जिल्ह्यातील तळागाळात पोहोचवली आहेत. त्यांचा जनसंपर्क आणि लोकांना आपलेसे करण्याचे कसब याचा विचार करता सरदार (सागर) भोगांवकर यांची जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठांशीही चर्चा करण्यात आली आहे.
त्यानुसार या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. याला एकमुखाने सर्वांनी पाठींबा दर्शवला. त्यामुळे सरदार (सागर) भोगांवकर यांची सातारा जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी बोलताना भोगांवकर म्हणाले, आगामी काळात सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून पक्षादेशाप्रमाणे वाटचाल करणार आहे. येत्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी आपली ताकद नक्कीच दाखवेल. जनशक्ती अभियानांतर्गत तालुकानिहाय दौरा प्रस्तावित करण्यात आला असून या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील तालुक्यांसह खेडी-पाडी, वाड्या-वस्त्यांपर्यंत आम आदमी पक्षाची ध्येय धोरणे पोहोचविण्याचे काम करणार आहे. महिनाभरातच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी पन्नास हजार कार्यकर्त्यांची भर पडणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संदीप माने, अतुल भोसले, सयाजी पाटील, अनिकेत खताळ, रवींद्र मांडवे आदी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 28th Oct 2023 02:24 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 28th Oct 2023 02:24 pm











