बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत मागितली खंडणी कोर्टाच्या आदेशाने साताऱ्यातील खण अळी मधल्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

कोर्टाच्या आदेशाने साताऱ्यातील खण अळी मधल्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

सातारा: बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने ७५ हजार रुपये घेतले ते परत दे, नाहीतर मुलाला व भाच्याला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुटुंबातील पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अभिषेक यतीन खुटाळे यांच्याकडून हेमंत सुधाकर सरवदे यांच्या मुलाने व भाच्याने ऑनलाईन पद्धतीने ७५ हजार रुपये घेतले. याची माहिती यतीन खुटाळे यांना कळताच त्यांनी पैसे लगेच परत करण्याची मागणी केली. वारंवार मागणी करूनही पैसे परत न दिल्याने हेमंत यांच्या मुलाला
व भाच्याला बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण करून याचा व्हिडिओ बनवून धमकवण्याचा प्रयत्न केला. हेमंत सरवदे यांनी सातारा, कोर्टात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार ऐश्वर्या खुटाळे (२०), सौ. विशाखा खुटाळे (४५), अभिषेक खुटाळे (सर्व रा. खणआळी सातारा), तपासे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), आर्यन नितीन खुटाळे (२१, रा. भवानी पेठ खणआळी सातारा) यांच्याविरूद्ध कोर्टाच्या आदेशाने धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त