डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून युवकाची आत्महत्या..

मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण..

कोरेगाव :  डॉक्टरांच्या मारहाणीमुळे कोरेगाव तालुक्यातील शशिकांत चंद्रकांत बोतालजी या युवकांने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे.. डॉक्टरांनी संगणमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप युवकांनी चिठ्ठी मध्ये नमूद केला आहे.. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..

शशिकांत हा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजारांचे ट्रांजेक्शन केलं आणि घराची जबरदस्ती नोटरी करून घेत डॉक्टरांनी जबरदस्तीने नावावर करून घेतले आहे.. हे करत असताना डॉक्टरांच्या युवकाला बेदम मारहाण केली.. या मारहाणीला आणि दबावला कंटाळून युवकाने चिट्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडालीये.. संबंधित डॉक्टर सुहास चव्हाण,डॉ गणेश होळ आणि गोपाळ साळुंखे यांना अटक झाल्याशिवाय युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला आसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला