सबको मार दूंगा, खल्लास करुंगा, तुझे घरदार संपवीन, मै खानसाब हूॅं, अशी धमकी दिल्याने सातारामध्ये गुन्हा दाखल
Satara News Team
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा: एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही, मी ३०७ मध्ये जामीनावर आहे हे विसरु नको, सब को मार दूंगा अशी धमकी देणाऱ्याच्या विराेधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील संशयित हा कऱ्हाड तालुक्यातील आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मुकुंद नामदेव कदम-पाटील (रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार फिरोज सलीम खान (रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे ओगलेवाडी येथील ओगले ग्लास वर्क्सचे संचालक आहेत. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सातारा शहरातील जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर हा प्रकार घडला.
संशयिताने मी तुझ्याविरोधात ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेले अर्ज फुकट मागे येतात. मला एक लाख रुपये द्या असे म्हटले. यावर तक्रारदार यांनी संशयिताला खोटेनाटे अर्ज करुन मला पैसे मागू नकोस असे म्हटले. यावरुन संशयित फिरोज खान याने एक लाख रुपये द्यावेच लागतील असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. तसेच सबको मार दूंगा, खल्लास करुंगा, तुझे घरदार संपवीन, मै खानसाब हूॅं, ३०७ मध्ये जामीनावर आहे विसरु नको, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात मुकुंद कदम यांनी तक्रार दिली.
सातारा शहर पोलिसांनी धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शितोळे हे तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 20th Jan 2024 12:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 20th Jan 2024 12:34 pm













