सोनवडी येथील बलात्कार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल
Satara News Team
- Sun 9th Jul 2023 12:45 am
- बातमी शेयर करा
सातारा : सोनवडी तालुका फलटण येथे एका आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला शोधून याला अटक करण्यात यावी, सदर महिलेला मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत देण्यात यावी तसेच संबंधित आरोपींवर आवश्यक कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद आहे की, सोनवडी येथे सामूहिकपणे महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना 19 जून रोजी घडली आहे. या प्रकरणात तिच्या मुलांना आणि पतीला डांबून ठेवण्यात आले. 7 जुलै 2023 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. या भट्टीवर काम करणारे कामगार कातकरी समाजातील आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सदर प्रकरणामध्ये महिला व बालकल्याण विभागाकडून ठोस उपाययोजनांची कार्यवाही होणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर महिला दक्षता कमिटी आहे. अशीच कमिटी गाव पातळीवर नेमण्यात यावी आणि त्या अधिक सक्षम होण्याकरता त्यांना प्रशिक्षण मिळावे.
एकूण पाच आरोपी होते, असे पिडीत स्त्रीचे म्हणणे आहे. त्या पाच आरोपींना कसे ओळखता येईल? याबाबतचा जो तपशील आहे तो तिला समुपदेशन करून त्याची समितीमार्फे नीट माहिती घेण्यात यावी. तिचा धीर वाढवून त्याबद्दलचे आणखी पुरावे कसे मिळतील ? याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे. या संदर्भात तपासी अधिकाऱ्यांना योग्य आदेश देण्यात यावेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण ? तसेच या घटनेचा छडा लागू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला का, याबाबत पोलिसांनी तपास करावा. आरोपींवर आवश्यक कलमे लावून त्यांच्यावर त्वरित लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावी. आरोपींना जामीन मिळणार नाही याकरता चांगला वकील द्यावा. सदर महिलेला मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळण्याकरता प्रयत्न करावा.
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sun 9th Jul 2023 12:45 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Sun 9th Jul 2023 12:45 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sun 9th Jul 2023 12:45 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sun 9th Jul 2023 12:45 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Sun 9th Jul 2023 12:45 am
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 9th Jul 2023 12:45 am
संबंधित बातम्या
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Sun 9th Jul 2023 12:45 am
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 9th Jul 2023 12:45 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 9th Jul 2023 12:45 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 9th Jul 2023 12:45 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 9th Jul 2023 12:45 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 9th Jul 2023 12:45 am













