करंजे भागाच्या विकासासाठी कुठेच कमी पडणार नाही आ. शिवेंद्रसिंहराजे;
अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा उत्साहात शुभारंभ
प्रकाश शिंदे - Wed 22nd Nov 2023 07:58 pm
- बातमी शेयर करा
सातारा- करंजे गावातील सर्व प्रकारच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले असून येथील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. करंजे व आसपासच्या परिसरात अनेक प्रकारची विकासकामे मार्गी लावली असून विकासाची प्रक्रिया पुढेही अखंडित ठेवणार आहे. करंजे भागाच्या विकासासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
करंजे येथे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून आणि विशेष निधीतून मंजूर झालेल्या करंजे कमान ते भैरवनाथ पटांगण ते झेंडा चौक, गणेश भोसले घर ते कुंभार घर गिरण, रघुनाथ पुरा, गोलपार, तोडकर कॉलनी, बसप्पा पेठ येथील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी गंगाधर फडतरे सर, जगन्नाथ किर्दत, अतुल चव्हाण, अमर इंदलकर- पाटील, बाळासाहेब भुजबळ, प्रलय शेटे, राजाराम पवार, आनंद शेंडे, निखिल भोसले, रविराज किर्दत, अजय इंदलकर, प्रणय किर्दत, गणेश भोसले यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
करंजे येथील रस्त्यांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील समस्या सोडवण्यासाठी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. येथील कर्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार अनेक प्रकारची विकासकामे मार्गी लावली असून यापुढेही उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.
स्थानिक बातम्या
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 22nd Nov 2023 07:58 pm












