युवतीचा विनयभंग प्रकरणी एसटीच्या लिपिकावर गुन्हा

सातारा  :  महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी बसमध्ये बसत असताना एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळात लिपिक अविनाश जगदेव राठोड (वय 32, रा. दौलतनगर, सातारा) याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. एसटी बसस्थानकातील जमावाने संशयिताची धुलाई केल्याची चर्चा आहे.


सातारा तालुक्यातील एक 17 वर्षीय युवती शहरातील एका महाविद्यालयात शिकत आहे. ती नेहमीप्रमाणे शुक्रवारी महाविद्यालयात आली होती. महाविद्यालय सुटल्यानंतर ती गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आली. ती बसमध्ये बसण्यासाठी जात होती. त्यावेळी बसमध्ये बसण्यासाठी झालेल्या गर्दीत अविनाश राठोड हादेखील होता.


त्याने त्या युवतीच्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली. हे लक्षात येताच त्या युवतीने इतर प्रवाशांना माहिती दिली. त्यानंतर प्रवाशांनी राठोड याची धुलाई केल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांचे पथक बसस्थानकात आले. पोलिसांनी राठोड याची जमावाच्या ताब्यातून सुटका करून, त्याला पोलीस ठाण्यात आणले. याबाबत पीडित युवतीने फिर्याद दिली असून, राठोडवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बिले तपास करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त