एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यात कॅफे चालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कॅफेच्या आडून बेकायदेशीर कृष्णकृत्य करणाऱ्यांनो सावधान चुकीत घावला की सुट्टी नाही.,

सातारा :  अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात सहकार्य केल्या प्रकरणी राजपथावरील एका कॅफेचालकांवर पोकसो अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  कॅफेच्या नावाखाली अल्पवयीन युवक युवतींना मोकळीक देणं अंगलट आलं असून त्याचा प्रत्यय शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईने सिद्ध झाला. या कारवाईने जिल्ह्यातील कॅफे संचालकांचे धाबे दणाणले आहेत. कॅफेच्या आडून बेकायदेशीर कृष्णकृत्य करणाऱ्यांनो सावधान चुकीत घावला की सुट्टी नाही., गुन्हा दाखल होणार व कारवाईसुद्धा करणारच असा सज्जड इशारा शाहूपुरी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी  कॅफे संचालकाना दिला. अंधाऱ्या कॅफेत शालेय तसेच महाविद्यालयीन  मुल मुली एकांतात नेमकं करतात काय? याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या पालकांची कीव करावीशी वाटते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी बोलताना दिली.  नकळत्या वयात काही पैशात मिळणारी मोकळीक आयुष्याची धूळधाण करून जात असताना याबाबत सजग राहून गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी तक्रार दारांनी पुढं येणं काळाची गरज बनली आहे. अनेक वेळा सार काही माहीत असून आपण साधलेली चुप्पी कोणाच्या तरी आयुष्यात माती कालवणारी ठरू शकते त्या साठी पोलीस तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास नुकताच राजपथावरील एका कॅफे चालकांवर अत्याचार प्रकरणात सहकार्य केल्या प्रकरणी  पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिला आहे.  शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत क्षेत्रातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात ४ ऑक्टोबर रोजी ३६३ , ३६६ , ३७६ , ३७६  त्याचबरोबर पोक्सो  कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता . या गुन्ह्यात  पोलिसांनी प्रमुख संशयित आरोपीला या आधी अटक केली . अल्पवयीन मुलीच्या जबाबाप्रमाणे व मुख्य संशयित आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी शाहूपुरी पोलिसांनी राजपथावरील एका कॅफेच्या चालकास गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी ताब्यात घेत त्याच्यावर पोक्सो  अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे . 

तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कॅफे संदर्भात नियमावली जाहीर केली व सातारा जिल्ह्यात एक आदर्श संहिता घालून दिली.  या नियमावलीचे पालन कॅफे चालकांकडून होते का? याची तपासणी वेळोवेळी करणे अत्यन्त गरजेचे बनले आहे.  संपूर्ण कॅफे प्रकाशात असावे , त्याठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे असावे ज्याची माहिती ग्राहकांना देणे आवश्यक, ग्राहक एकमेकांना दिसतील अशी कॅफेत आसनव्यवस्था असावी., मुबलक प्रकाश योजना. पारदर्शक काचा,दरवाजे आवश्यक आहेत . मात्र आजही अनेक  कॅफेमध्ये छुपे कंपार्टमेंट,अंधाऱ्या खोल्या,बैठकी आहेत . जिथे शालेय तसेच महाविद्यालयीन युवक युवतींना काही  रुपयात एकांत दिला जातो . या कॅफेच्या आस्थापना चालकावर प्रभावी निर्बंध नसल्याने, कॉफीकॅफे व हॉटेल मध्ये गैरकृत्यांना चालना मिळेल अशा प्रकारची बैठक व्यवस्थेत नियमबाह्य बदल करून वापर सुरू आहे का? हे तपासणे आवश्यक बनले आहे.  कॉफीशॉप व हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले-मुली यांचा वावर मोठ्या प्रमाणात का वाढला? व्यवसाय चालक हे त्यांना बसण्याकरिता म्हणून कालावधीनुसार शुल्क आकारून एक प्रकारे गैरकृत्य करण्यास चालना देत आहेत का? बहुधा कॉफीशॉप, हॉटेलमध्ये युवक व युवती तसेच अल्पवयीन मुले-मुली हे तासनतास बसून अश्लील वर्तन करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण किती आहे. या सर्व गंभीर वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य पालक, सजग नागरिक व पोलिसांनी शोधणे काळाची गरज बनली आहे. 

दरम्यान राजपथावर असलेल्या एका कॅफेत  लैंगिक छळ झाल्या प्रकरणी सहकार्य करणाऱ्या कॅफे संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने कॅफेचालकामध्ये खळबळ उडाली आहे.  

 

सातारा न्यूजने वेळोवेळी या कॅफे चालकांचा पडदा फाशा करण्याचा प्रयत्न केला आहे अंधाऱ्या कॅफेमध्ये नक्की चाललय काय या शीर्षकाखाली कॅफे चालकांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला आहे.  साताऱ्यात बरेचसे असे कॅफे आहेत की या कॅफेमध्ये अल्फवयीन मुला-मुलींना असशील कृत्य करण्यास वाव दिला जातो या अशा कॅफेचालकांमुळे खरोखरच जे चांगला धंदा करत आहेत त्यांच्यावर सुद्धा बर्डन येण्याची वेळ आली आहे.  शाहूपुरी पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला