ठेकेदाराने १० दिवसांत महामार्ग दुरुस्त न केल्यास गुन्हे दाखल करणार ... जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Satara News Team
- Mon 5th Aug 2024 07:59 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा- पुणे तसेच पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या महामार्गावर खड्डे पडले आहेत. महामार्गांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. महामार्ग दुरुस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. संबंधित ठेकेदाराने १० दिवसांत महामार्ग दुरुस्त न केल्यास दंडात्मक कारवाई करणारच पण आवश्यकता वाटल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. साताऱ्यास सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करून धरणांची पाणीपातळी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय हवामानशास्त्राच्या सूचनांनुसार पाटबंधारे विभागाने धरण पाणीसाठा व्यवस्थापन चांगले केले. टप्प्याटप्प्याने धरण विसर्ग वाढवल्याने सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. साताऱ्यासाठी दोन दिवस रेड अलर्ट असताना सांगली, कोल्हापूरला पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ३.५ टीएमसी अतिरिक्त साठा ठेवण्यात आला आहे.
याबाबत परवानगी घेण्यात आली आहे. तलाव, केटिवेअर भरुन घेण्यात येणार आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत. सातारा - पुणे महामार्ग तसेच पोवई नाका - बॉम्बे रेस्टॉरंट चौक महामार्गावर खड्डे पडले आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून लेखी सुचना केल्या आहेत. संबंधित ठेकेदारांकडून १० दिवसांत रस्ते दुरुस्त न केल्यास दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करणार आहे, असा इशारा जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 5th Aug 2024 07:59 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 5th Aug 2024 07:59 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 5th Aug 2024 07:59 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 5th Aug 2024 07:59 am
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Mon 5th Aug 2024 07:59 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 5th Aug 2024 07:59 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Mon 5th Aug 2024 07:59 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Mon 5th Aug 2024 07:59 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Mon 5th Aug 2024 07:59 am
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Mon 5th Aug 2024 07:59 am
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Mon 5th Aug 2024 07:59 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Mon 5th Aug 2024 07:59 am












