सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?

सातारा  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून दिगाजांना पराभव पत्करावा लागला साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार केला ८ विधानसभा मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवत शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपार केला आहे.साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. आता या ८ जणांमध्ये कोणाच्या नशिबी लाल गाडी येणार? जिल्ह्याला कोणती खाती मिळणार? याकडे संपूर्ण सातारा जिल्याचे लक्ष लागून आहे .

सलग ५ टर्म साताऱ्याचे आमदार राहीलेल्या शिवेंद्रराजे तर पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारलीय ते शंभूराज देसाई आणी खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रिपदाबाबत थेट संकेत दिल्यने मकरंद पाटील , तर कोरेगावचे महेश शिंदे यांची शशिकांत शिंदे याना दिल्येली कडवी झुंज , माण खटाव मध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळून देणारे जयकुमार गोरे या पाच जाणा पैकीकोणाच्या नशिबी लाल गाडी येणार ?

 सलग ५ टर्म साताऱ्याचे आमदार राहीलेल्या शिवेंद्रराजेना यंदा महाराष्ट्रात एक नंबरचे मताधिक्य मिळवले आहे . तायतच दोनी भाऊ एकत्र झाल्याने साताऱ्यालाच मंत्रिपद मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवेंद्रराजे यांचे बंधू आणि भाजपचा खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. शिवेंद्रराजेंना मंत्रिपद द्या, मी जिल्ह्यात भाजप वाढवतो, असा शब्द श्री.छ. खा. उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याच्या चर्चा आहेत. मतदारसंघातील विकासकामे, छत्रपती घराण्याचे वलय, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेले एकहाती वर्चस्व हि शिवेंद्रराजे यांची जमेची बाजू आहे.त्या मुळे शिवेंद्रराजेनच मंत्रिपद फिक्स मानलं जात आहे. 

 सातारा जिल्ह्याला २ किंवा ३ च मंत्रीपदे मिळणार असल्याने कोणाला मंत्रिपद द्यायचं याचा पेच महायुतीसमोर निर्माण झाला आहे. आता सातारा जिल्ह्यातून कोणाकोणाला लाल दिव्याची गाडी मिळेल? मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? हे उद्या स्पष्ट होणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला