उंब्रज येथुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा,
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानी भेट घेतलीSatara News Team
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
- बातमी शेयर करा
उंब्रज ; उंब्रज येथुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फलाय ओव्हर बनविणेत यावा, या ठिकाणी सेवा रस्त्यावर ड्रॉप ॲन्ड पिकअप पॉईट करावा. नागठाणे येथे फलायओव्हरच्या खाली प्रस्तावित असणारा अंडरपास मोठा करावा, वाहतुक आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिआवश्यक असलेल्या या कामांना सर्वोच्य प्राधान्य देत कार्यवाही करावीअशी मागणी आज केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांचेकडे केली आज नवी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानी भेट घेत, त्यांच्याशी जिल्ह्यातील रस्त्यांच्या संदर्भात चर्चा केली.
त्यावेळी आवर्जुन नमुद करताना सांगीतले की, सातारा जिल्हयातील आणि कराड तालुक्यातील उंब्रज हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे गाव आहे. , याठिकाणी दोन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गास छेदत असून, जिल्ह्यातील झपाटयाने विकसित होणारे गाव म्हणून उंब्रज कडे पाहिले जाते. कृष्णा, तारळी व मांड नद्या सुध्दा या गावातून वहात आहेत. साधारण ४५,००० लोकसंख्या असणा-या उंब्रज येथे सुमारे २० वर्षापुर्वी भराव पद्धतीचा फ्लायओव्हर बनविला आहे. त्यामुळे उंब्रज गावच्या ग्रामस्थांच्या व्यावसायिक आर्थिक उन्नतीवर विपरित परिणाम झाला आहे. उंब्रज ग्रामस्थांनी आमच्याकडे वेळोवेळी भराव पदधतीचा फ्लायओव्हर ऐवजी सेगमेंट अर्थात पारदर्शक पुल करण्यासंबंधी मागणी केली होती. तसेच नागठाणे येथे फालायओव्हर बरोबर मोठा अंडरपास बांधण्याबाबत मागणी केली आहे. नागठाणे हे देखिल एक व्यापारी गांव म्हणून नावारुपाला आलेले आहे. नागठाणे पंचक्रोशीसह पाडळी, निनाम अश्या मोठया लोकसंख्येच्या गावांचा राष्ट्रीय महामार्गाशी दररोज संबंध येत असतो. त्यामुळे नागरीकांची गरज आणि समाजाचे हित लक्षात घेवून ही कामे मार्गी लावावीत तसेच साता-याकडून पुण्याला जाताना, पारगांव खंडाळा आणि शिरवळ या ठिकाणी असणारे सेवारस्ते रुंद करणे आवश्यक आहे. येथील एमआयडीसी- पंढरपूर कडे जाणा-या वाहनांना मोठी कसरत करावी लागतेच तथापि ते जास्त गैरसोयीचे ठरत आहे.
त्यामुळे याठिकाणी नवीन फलायओव्हर करावा. या ठिकाणी आत्ताच्या सेवा रस्त्यांचे नियमानुसार रुंदीकरण करण्यात येवून, पारगांव खंडाळा आणि शिरवळ येथे ड्रॉप ॲन्ड पिकअप पॉईट शेडसह निर्माण करावेत, जेणेकरुन वळणा-या वाहतुकीला सोयीचे होवून महामार्गावरील वाहतुकीलाही कोणताही अडथळा न होता, वाहनधारकांची मोठी सोय हाईल. म्हणूनच ही प्रस्तावित केलेली कामे हाती घेण्यात यावी अशी आग्रही विनंती यावेळी केली. केंद्रातील हेवीवेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणा-या आणि आमच्याशी घनिष्ठ संबंध असणा-या ना. नितिन गडकरी यांनी जागेवरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रजनीश कपूर यांना बोलावले आणि आता उंब्रज येथील सुरु असलेल्या कामामधुन उंब्रज येथील पारदर्शी नवीन पूल उभारण्याबाबाबत कार्यवाही करावी अश्या सूचना दिल्या. तसेच याकरीता लागणारा निधी मंजूर करण्याचे अभिवचन दिले.
त्याचप्रमाणे पारगांव-खंडाळा , शिरवळ येथील फलायओव्हर, सेवा रस्ता, पिकअप आणि ड्रॉप पाईट तसेच नागठाणे येथील अंडरपास बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशू मलिक, श्रीवास्तव, पुणे व कोल्हापूर येथील महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम व वसंत पंधारकर यांचे समवेत विशेष बैठक घेवून सदरचे प्रश्न मार्गी लावले जातील असेही ना. नितिन गडकरी यांनी आश्वासित केले.
यावेळी ना.गडकरी यांचे सहाय्यक दिपक शिंदे, अमोल बिराजदार,यांचेसह काका धुमाळ, ॲङ विनित पाटील, दिल्लीतील स्वीय सहाय्यक करण यादव उपस्थित होते.
दरम्यान, उंब्रज येथील भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारण्याच्या उंब्रजकरांच्या मागणी बाबत जोरदार प्रयत्न करुन, सदरचे काम तत्वत: मंजूर करुन घेतल्याबद्दल उंब्रज आणि परिसरातील नागरीकांमध्ये समाधान पसरले आहे.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Wed 18th Dec 2024 07:50 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Wed 18th Dec 2024 07:50 pm












