स्वातंत्र्य सेनानी किसन वीर यांची कापडगाव शाळेत जयंती साजरी

फलटण: थोर स्वातंत्र्य सेनानी  देशभक्त किसन  वीर यांची ११८ वी जयंती जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा कापडगाव येथे साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आबासाहेव वीर यांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य उत्तर काळातील कार्याला उजाळा देण्यात आला.त्याप्रसंगी आबासाहेबांचे   स्वातंत्र्य चळवळ,सहकार,आर्थिक, सामाजिक  क्षेत्रातील कार्य मोलाचे असल्याचे सुजन फौंडेशन चे अध्यक्ष अजितकुमार जाधव  यांनी सांगितले.
       भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुजन फौंडेशनच्या वतीने कापडगाव शाळेतील उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री संजय धुमाळ ,श्री देवदास कारंडे,श्री अभिजित ताटे,श्रीम हसीना पटेल यांचा शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शाल, श्रीफळ, फुले दाम्पत्याची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. सौ नलिनी साळुंखे व सौ अर्चना खताळ या  आशा स्वयंसेविकाना ही कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल  सन्मानचिन्ह देऊन खंडाळा डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीम बिलकिस शेख यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवदास कारंडे सर यांनी केले .सौ निकिता खरात, सोनाली खताळ व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.हसीना पटेल मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला